घरपालघरसर्वसामान्यांभोवती महागाईचा विखळा

सर्वसामान्यांभोवती महागाईचा विखळा

Subscribe

कोरोना विषाणूचे संकट आल्यापासून महागाई दिवसेंदिवस वाढू लागली आहे. वर्षभरात पेट्रोल लिटरमागे सरासरी २१ तर खाद्यतेल ५० रुपयांनी महागले आहे.

कोरोना विषाणूचे संकट आल्यापासून महागाई दिवसेंदिवस वाढू लागली आहे. वर्षभरात पेट्रोल लिटरमागे सरासरी २१ तर खाद्यतेल ५० रुपयांनी महागले आहे. त्याचबरोबर गॅस सिलिंडर, बांधकाम साहित्य दरवाढीची घोडदौड सुरूच आहे. कोरोनामुळे एकीकडे रोजगार कमी झाला, हातावर पोट असणाऱ्यांचे व्यवसाय बंद पडले. पण दुसरीकडे मात्र महागाईने पाय पसरल्याचे दिसून येत आहे. सद्य:स्थितीत कोरोनाचा कहर सुरू आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे व्यवसायांवर परिणाम झाला. सामान्यांची कामे बंद पडली आहेत. छोट्या विक्रेत्यांना तर दुकानांना टाळे लावावे लागले. त्यातच इंधनाचे दर वाढतच चालले आहेत. यामुळे महागाई आगीत तेल ओतण्याचेच काम करत आहे. त्याचबरोबर कोरोना संकटाचा आयात-निर्यातीवर परिणाम झाला आहे. यामुळे पाश्चात्य देशांनी कर वाढवल्याने खाद्य तेलालाही महागाईची फोडणी बसली आहे.

मोखाडा तालुक्यात पेट्रोलला १०१ रुपये मोजावे लागत आहेत. त्याचबरोबर गेल्यावर्षी डिझेलला लिटरला ६६.९० दर होता. आता ९० रुपये लिटरवर पोहोचले आहे. यावरून अवघ्या वर्षभरात पेट्रोल २२ तर डिझेलमागे सरसरी २३ रुपयांची वाढ झाली आहे. या इंधनवाढीवरही महागाईचे गणित बहुतांशी अवलंबून आहे. कारण, आज यंत्राच्या सहाय्याने शेतीची कामे करायची झाली तर एकरी खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचबरोबर शेतमाल बाजारपेठेत घेऊन जायचे झाले तरी भाड्यात वाढ झाली आहे.

- Advertisement -

खाद्यतेलामुळे तर महागाईला कडकच फोडणी मिळाली. कारण, देशात ७० टक्केर तेल आयात होते. पाश्चात्य देशांनी अर्थव्यवस्था सुधरण्यासाठी निर्यात कर वाढवला आहे. त्यामुळे सहा महिन्यांपासून खाद्यतेलाच्या दरात वाढ होत आहे. कोरोनामुळे कामं बंद पडत आहेत. सामान्यांना घरात बसून दिवस ढकलावे लागत आहेत. पोलिसांच्या भीतीने हातगाडीधारक गल्लीबोळात जाऊन साहित्य विक्री करत जगण्यासाठी धडपड करत आहेत. अशा काळात महागाई हातपाय अधिकच पसरू लागली आहे.

किचनशी संबंधित गोष्टी आटोक्याचत आल्या तर सामान्यांना अच्छे दिन असतात. यामध्ये गॅस सिलिंडर महत्त्वपूर्ण ठरते. पण गेल्या वर्षभराचा विचार करता सिलिंडरचा दर जवळपास २२५ रुपयांनी वाढला आहे. यामध्ये फक्तय एकदाच तेही दीड महिन्यापूर्वी १० रुपये कमी होते.

इंधन दर रुपयांत (मार्च २०२० ते मे २०२१)

  • पेट्रोल : ७७.९५ – १०१
  • डिझेल : ६६.८४ – ९०

खाद्यतेल प्रतिकिलो दर (मार्च २०२० ते मे २०२१)

  • सोयाबीन : ९० – १४५
  • सूर्यफूल : १०० – १८०
  • शेंगदाणा : १४० – १८०
  • पामतेल : ८० – १३०
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -