घरपालघरट्रेलरसह पळालेले दरोडेखोर जेरबंद

ट्रेलरसह पळालेले दरोडेखोर जेरबंद

Subscribe

यावेळी चोरी केलेला लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करून दोन गावठी कट्टे, एक जिवंत काडतूस आणि गुन्ह्यात वापरलेले एक चारचाकी वाहन पोलिसांनी जप्त केले आहे.

वसई : वज्रेश्वरी-शिरसाड रस्त्यावर शनिवारी पहाटे चालकाला पिस्तुलाचा धाक दाखवून ट्रेलरसह ४२ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून पळालेल्या चार दरोडेखोरांना गुन्हे शाखा तीनच्या पथकाने अटक केली आहे. यावेळी चोरी केलेला लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करून दोन गावठी कट्टे, एक जिवंत काडतूस आणि गुन्ह्यात वापरलेले एक चारचाकी वाहन पोलिसांनी जप्त केले आहे. अंबाडीहून वज्रेश्वरी – शिरसाडमार्गे मुंबईच्या दिशेने १७ लाख २० हजार रुपये किंमतीचे लोखंडी सळई भरलेला ट्रेलर घेऊन चालक राजकुमार सिंग (५५) निघाले होते. शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास पारोळजवळ एका चारचाकी वाहन आडवे घालून ट्रेलर थांबवण्यात आला. त्यानंतर चार जणाच्या सशस्त्र दरोडेखोरांचा टोळीने राजकुमार सिंग यांना पिस्तुलचा धाक दाखवून बांधून ट्रेलरमध्ये कोंबून ट्रेलर पुढे नेला होता. यावेळी त्यांना मारहाणही करण्यात आली होती.

विरार फाटा येथे राजकुमार सिंग यांना उतरून ट्रेलर घेऊन दरोडेखोर पळून गेले होते. याची तक्रार राजकुमार सिंग यांनी पेल्हार पोलिसांना दिल्यानंतर ४२ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखेच्या युनिटच्या पोलिसांना हे दरोडेखोर शिरसाड हायवेवर येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी पाठलाग करत चारही दरोडेखोरांना अटक केली आहे. नौशाद अहमद (२४), मोहम्मद समीर कुरेशी (२१), मेहताब अली (२१) आणि मोहम्मद दानिश खान (२०) अशी पकडलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. या आरोपींवर हत्या, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, खंडणी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -