घरपालघरमंदिरातील दानपेटीवर दारुड्यांचा डल्ला

मंदिरातील दानपेटीवर दारुड्यांचा डल्ला

Subscribe

दानपेटी तोडून आतमधील हजारो रुपयांची रोकड लंपास करीत तसेच त्या नंतर आवारातील कार आणि खुर्च्या यांची जाळपोळ करत चोरट्यांनी पलायन केले आहे.

बोईसर : बोईसर परिसरातील वाढती गुन्हेगारी पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे. हाणामारीच्या घटनांसोबतच दारुडे,गर्दुल्ले आणि चोरट्यांनी देखील परिसरात धुमाकूळ घातला आहे. बोईसर पालघर मुख्य रस्त्याशेजारील रेल्वे यार्ड समोरील साई मंदिरातील पुजार्‍याला रात्रीच्या सुमारास चाकूचा धाक दाखवत दानपेटीवर दारुड्यांनी डल्ला मारल्याची घटना उघड झाली आहे. दानपेटी तोडून आतमधील हजारो रुपयांची रोकड लंपास करीत तसेच त्या नंतर आवारातील कार आणि खुर्च्या यांची जाळपोळ करत चोरट्यांनी पलायन केले आहे.

बोईसर रेल्वे यार्ड लगत असलेल्या साईबाबा मंदिर परिसरात रात्रीच्या सुमारास माया काठे आणि युनूस इस्माईल हे दोघे दारू पीत बसले होते.दारू पिऊन झाल्यावर रात्री ३ वाजताच्या सुमारास मंदिरातील पुजारी गोविंद वानरे यांना चाकूचा धाक दाखवत आणि मारहाण करत मंदिराचं कुलूप तोडून दोन दारुडे दानपेटीतील हजारो रुपये घेऊन ते पसार झाले . मंदिर आवारात पार्किंग केलेली हुंडाई सेंट्रो कार आणि मंदिरातील खुर्च्या जाळून या चोरट्यांनी पळ काढला असून या घटनेप्रकरणी बोईसर पोलिस स्टेशन येथे फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. बोईसर परिसरात वारंवार होणार्‍या गुन्ह्यांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली असून येथील गुन्हेगारांवर आळा घालण्यात पोलीस प्रशासनाला अपयश येत असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा उघड झाले आहे .

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -