घरपालघरखासगी बसेसच्या जादा दर आकारणी चाप; आरटीओकडून दरपत्रक जाहीर

खासगी बसेसच्या जादा दर आकारणी चाप; आरटीओकडून दरपत्रक जाहीर

Subscribe

एसटी महामंडळानंतर आरटीओने खासगी बससाठीचे तिकीट दर जाहीर केले आहेत. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांकडून जादा दर आकारल्यास कडक कारवाई करणार असल्याचा इशारा आरटीओने दिला आहे.

एसटी महामंडळानंतर आरटीओने खासगी बससाठीचे तिकीट दर जाहीर केले आहेत. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांकडून जादा दर आकारल्यास कडक कारवाई करणार असल्याचा इशारा विरार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डी. जी. वाघुले यांनी खासगी ट्रॅव्हल्स मालक व एजंट यांना दिला आहे. गणेश उत्सवासाठी पालघर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात प्रवासी कोकणात जात असतात. दरवर्षी प्रमाणे यावर्षी पालघर, विरार, बोईसर, वसई या भागातील प्रवासी कोकणात जाणार आहेत. प्रवाशांची संख्या लक्षात घेता एसटी महामंडळाच्या बसेसशिवाय प्रवासी खासगी बसेसमधूनही प्रवास करत असतात. त्यामुळे खासगी बस चालक प्रवाशांकडून जास्त भाडे आकारण्याची शक्यता नाकारता येत नाही. खाजगी बसचालकांना एसटी महामंडळाच्या बसेसच्या भाड्यापेक्षा जास्तीत जास्त दीडपट भाडे आकारण्याची मुभा आहे.

प्रवाशांकडून एसटी महामंडळाच्या बसच्या भाड्याच्या जास्तीत जास्त दीडपट पेक्षा जास्त भाडे आकारणी करु नये. त्यापेक्षा जास्त भाडे आकारणी केल्याचे या कार्यालयाच्या तपासणी पथकास आढळून आल्यास किंवा तशा प्रकारची तक्रार प्राप्त झाल्यास मोटार वाहन कायद्यामधील तरतुदीच्या अनुषंगाने कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा वाघुले यांनी दिला आहे. खासगी ट्रॅव्हल्सकडून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची बेसुमार लूट केली जाते. त्यामुळे विरार परिवहन विभागाने निश्चित दरपत्रक जाहीर करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महेश कदम यांनी केली होती. त्याकरता त्यांनी विरार परिवहन कार्यालयासमोर गणेशमूर्ती घेऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र या मुदतीत परिवहन विभागाने दरपत्रक निश्चित न केल्याने कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनाची दखल विरार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डी. जी. वाघुले यांनी घेतली. महाराष्ट्र राज्य परिवहनचे जितके भाडे असेल त्याच्या दीडपट भाडेच घेणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा जास्त भाडे घेतल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा वाघुले यांनी दिला आहे. तसेच एसटी महामंडळाने आपले दरपत्रक जाहिर केले असून त्यापाठोपाठ आरटीओनेही दरपत्रक जाहिर केले आहे.

- Advertisement -

दरपत्रक          एसटीचे दर             खासगी बसचे दर

विरार-चिपळूण         ५०० रुपये                              ७५० रुपये
विरार-रत्नागिरी         ६३५ रुपये                              ९५३ रुपये
विरार-गुहागर          ५५० रुपये                              ८२५ रुपये
विरार-कणकवली      ७९० रुपये                             ११८५ रुपये
विरार-कुडाळ          ८६० रुपये                             १२९० रुपये
विरार-सावंतवाडी      ८९० रुपये                             १३३५ रुपये
विरार-कोल्हापूर       ६८५ रुपये                            १०२८ रुपये
विरार-देवगड          ८७० रुपये                             १३०५ रुपये
विरार-राजापूर         ७०५ रुपये                              १०५८ रुपये
विरार-लांजा            ६८० रुपये                              १०२० रुपये
विरार-खारेपाटण       ७४० रुपये                              १११० रुपये
विरार-मालवण         ८४५ रुपये                              १२६८ रुपये
विरार-संगमेश्वर       ५४५ रुपये                              ७१८ रुपये

हेही वाचा –

OBC Reservation : निवडणुका लांबणार, आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठकीत एकमत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -