घरपालघरभरधाव डंपरची मासळीच्या टेम्पोला धडक, ३ जण गंभीर जखमी

भरधाव डंपरची मासळीच्या टेम्पोला धडक, ३ जण गंभीर जखमी

Subscribe

जखमींना उपचारासाठी बेटेगाव येथील अधिकारी लाईफ लाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तर अपघात होताच डंपरचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

बोईसर : बोईसर-चिल्हार मार्गावरील मान येथे भरधाव डंपरने मासळी भरलेल्या टेम्पोला दिलेल्या धडकेत ३ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.या अपघातात टेम्पोमधील मासळी आणि बर्फ रस्त्यावर पडून वाया गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तारापूर औद्योगिक वसाहतीला जोडणार्‍या बोईसर-चिल्हार रस्त्यावर अपघातांचे सत्र सुरूच आहे.अवजड मालवाहू आणि गौण खनिज वाहतूक करणारी वाहने बेशिस्त आणि भरधाव वेगाने धावत असल्याने दुचाकी आणि लहान वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. मान गावाजवळ जवळ गौण खनिज वाहतूक करणार्‍या लक्ष्मी ट्रान्सपोर्टच्या भरधाव डंपरने मासळी वाहतूक करणार्‍या टेम्पोला जोरदार धडक दिली.ही धडक इतकी जोरदार होती की टेम्पोचा पार चेंदामेंदा होऊन सुरज अजय दौडा(वय १७ वर्षे),अजय दौडा(वय ४५ वर्षे) आणि अखिलेश चौधरी(वय २४ वर्षे )असे तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.जखमींना उपचारासाठी बेटेगाव येथील अधिकारी लाईफ लाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तर अपघात होताच डंपरचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

बोईसर ते चिल्हार हा तारापूर औद्योगिक वसाहतीला जोडणारा रस्ता प्रचंड वाहतुकीचा आहे.या रस्त्यावरून तारापूर एमआयडीसी,तारापूर अणूऊर्जा प्रकल्प,बीएआरसी सारख्या मोठ्या प्रकल्पात कामासाठी रोज हजारो कामगार दैनंदिन प्रवास करीत असतात.आधी दुपदरी असलेला हा रस्ता चौपदरी झाल्यापासून अवजड वाहनांचा वेग प्रचंड वाढला आहे.या रस्त्यावरून डंपर,हायवा सारख्या अवजड वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक (ओवरलोड) गौणखनिज भरून मालाची वाहतुकीचे नियम मोडून सतत वाहतूक केली जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -