घरपालघरबॉक्सच्या मागे चिंध्या भरलेल्या गोणी ठेवण्यात आल्या..पण पोलिसांना सापडलेच

बॉक्सच्या मागे चिंध्या भरलेल्या गोणी ठेवण्यात आल्या..पण पोलिसांना सापडलेच

Subscribe

मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघरमधील दापचरी जकात नाक्यावर ही कार्यवाही करण्यात आली आहे.

डहाणू:  उत्पादन शुल्क विभाग अवैध मध्य साठा आणि वाहतुकीवर मद्य तस्करांकडून मोठ्या प्रमाणावर कारवाई करत असतो.मात्र,यावेळी चक्क 1 कोटी रूपयांचा मद्य साठा उत्पादन शुल्क विभागाच्या हाती लागला आहे. महाराष्ट्रात विक्रीस आणि वाहतुकीस बंदी असलेले दादरा नगर हवेली बनावटीचे मद्य बेकायदेशीररित्या महाराष्ट्रात वाहतूक करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई भरारी पथकाने धडक कारवाई करत जवळपास एक कोटी मुद्देमाल जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज खान यांच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली असून या कारवाईत 700 हून अधिक महागड्या मद्याचे बॉक्स जप्त करण्यात आले आहेत.ज्वाला दीनदयाल सिंग ,राजेंद्र सिंग आणि समीर रमजान शेख अशी आरोपींची नावे आहेत. मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघरमधील दापचरी जकात नाक्यावर ही कार्यवाही करण्यात आली आहे.

मद्य वाहतूक करणार्‍या टेम्पोसह एक ट्रक जप्त करण्यात आला आहे. तसेच तीन आरोपींना देखील अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई भरारी पथकाने रात्रीपासून महामार्गावर पाळत ठेवली होती. गुरुवारी सकाळी गुजरात मुंबईकडे जाणार्‍या एका टेम्पोला धुंदलवाडीजवळ तर एका ट्रकला आंबोलीजवळ संशयित रित्या पकडून त्याच्यावर कार्यवाही करण्यात आली. विशष म्हणजे टेम्पोत आणि ट्रकमध्ये असलेले मद्य वाहतूक करताना कोणाच्या निदर्शनास येऊ नये म्हणून या बॉक्सच्या मागे चिंध्या भरलेल्या गोणी ठेवण्यात आल्या होत्या. ही कारवाई मुंबई उत्पादन शुल्काचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज खान, विजयकुमार थोरात , एस .दाते दुय्यम निरीक्षक जवान बाबा बोंनंदे,संतोष शिवापुरकर ,शाहरुख तडवी ,दीपक कळंबे ,अविनाश जाधव ,रवी पाटील तसेच पालघर आणि डहाणू उत्पादन शुल्काचे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -