Maharashtra Assembly Election 2024
घरपालघरसफाळे रेल्वे फाटक कायमचे बंद होणार?

सफाळे रेल्वे फाटक कायमचे बंद होणार?

Subscribe

त्यामुळे सफाळे रेल्वे फाटक कायमचे बंद होणार की काय? आणि झाल्यास नागरिक व प्रवाशांची मात्र प्रचंड मोठी गैरसोय होणार आहे.

सफाळे: डीएफसीसी रेल्वे प्रशासनाने सफाळे रेल्वे फाटक सात दिवस बंद करण्याच्या सूचना दिल्यानंतर तेच फाटक कायमचे बंद होण्याची टांगती तलवार निर्माण झाली आहे. सफाळे देवभूमी सभागृहातील बैठकीमध्ये सफाळे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांनी सफाळे रेल्वे फाटक 6 ते 12 फेब्रुवारीपर्यंत बंद होण्याबद्दल माहिती दिली. भविष्यात हे फाटक कायमचे बंद होण्याची चिन्हे आहेत. सुमारे 50 गावांपेक्षा अधिक गावे सफाळे बाजारपेठेची जोडली गेली आहेत. किंबहुना अनेक प्रवासी आणि नागरिक हे पूर्व व पश्चिम दिशेकडून फाटकातून ये-जा करत असतात. जर हे फाटक कायमचे बंद झाले तर येण्या-जाण्यासाठी सुमारे पाच ते सहा किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास अधिकचा करावा लागणार आहे. कपासे येथील रेल्वे ओव्हर ब्रिज हा सध्याचा एकमेव मार्ग पूर्व व पश्चिम दिशेला जोडण्यासाठी आहे. सरतोडी येथे होणारा रेल्वेवरील ओवरब्रिज अद्याप अपूर्ण आहे व त्याचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. असे असले तरी हे दोन्ही ब्रिज सफाळे मध्यवर्ती भागापासून खूप अंतरावर आहे. येथून प्रवासी व नागरिकांना येणे जाणे शक्य होणार नाही. त्यामुळे सफाळे रेल्वे फाटक कायमचे बंद होणार की काय? आणि झाल्यास नागरिक व प्रवाशांची मात्र प्रचंड मोठी गैरसोय होणार आहे.

याबाबत बोलताना, रेल्वे प्रशासनाचा हा निर्णय सामान्य प्रवासी व नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारा आहे. पहाटे भरणारा तीन वाजताचा बाजार देखील प्रचंड गर्दीने भरणार आहे. फाटक कायमचे बंद होणार हे जरी विधीलिखित असले तरी त्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यासाठी रेल्वे प्रशासन मात्र कुंभकर्णाप्रमाणे सुस्त असल्याचे दिसते. यासाठी स्थानिक आमदार व खासदारांनी लवकरात लवकर पुढाकार घेऊन पादचारी फुल किंवा भुयारी मार्ग अशी व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करावेत,असे डीव्हीपीएसएस सफाळे कमिटीचे अध्यक्ष जतिन कदम यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -