घरपालघरलिफ्टमध्ये अडकलेल्या दोघांची सुखरूप सुटका

लिफ्टमध्ये अडकलेल्या दोघांची सुखरूप सुटका

Subscribe

ओझेफा शेख सिमेंटवाला यांनी या घटनेची माहिती अग्निशामक विभागाला देताच काही मिनिटातच घटनास्थळी पोहोचत त्यांनी या दोघांची लिफ्टमधून सुटका केली आहे.

भाईंदर :  मिरारोड पूर्वेच्या कणकीया परिसरात व्ही पॉवर जिमजवळ असणार्‍या रश्मी प्राईम कॉर्नर या इमारतीची लिफ्ट रात्री १२.४८ वा.च्या सुमारास अचानक बिघडल्याने लिफ्ट मध्ये २ जण अडकल्याची घटना घडली होती. अडकलेल्या दोघांना मिरा भाईंदरच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी लिफ्टचा वरचा पत्रा तोडून बाहेर काढत त्यांची सुखरूप सुटका केली आहे. महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी रात्री दीड वाजेपर्यंत अग्निशामक दलाच्या अधिकार्‍यांसोबत संपर्क साधत घटनेची माहिती घेत होते त्याच बरोबर त्यांना सूचना देखील देत होते.
रश्मी प्राईम कॉर्नर या इमारतीची लिफ्ट सोमवारी रात्री १२.४८ च्या सुमारास अचानक बंद पडल्याने त्यात आदम सिमेंटवाला वय १५ वर्ष व सारा २२ वर्ष हे दोघे जण अडकले होते. ओझेफा शेख सिमेंटवाला यांनी या घटनेची माहिती अग्निशामक विभागाला देताच काही मिनिटातच घटनास्थळी पोहोचत त्यांनी या दोघांची लिफ्टमधून सुटका केली आहे. यात कोणी जखमी अथवा मृत नसून या इमारतीत २४ रूम असून त्यात १०० रहिवासी राहत आहेत, मात्र लिफ्टचे मेन्टेनन्स झाले नसल्याने लिफ्ट बंद पडली असावी, अशी माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -