घरपालघरतलासरीत विद्यार्थ्यांच्या पोषण आहारावर शिक्षकाचा डल्ला

तलासरीत विद्यार्थ्यांच्या पोषण आहारावर शिक्षकाचा डल्ला

Subscribe

शाळेतील विद्यार्थ्यांसाठी येणारे धान्य एक महिला डोक्यावरून वाहून नेत असल्याचा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आल्यावर त्यांनी महिलेस जाब विचारून धान्य परत शाळेत ठेवण्यास भाग पाडले आहे.

डहाणू : तलासरी तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाकडून विद्यार्थ्यांसाठी आलेल्या पोषण आहाराचे धान्य परस्पर विक्री करण्याचा प्रयत्न ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे उघड झाला आहे. तलासरी तालुक्यातील कोचाई पाटील पाडा येथील जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या हक्काचे धान्य परस्पर विक्रीचा प्रयत्न केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सध्या उन्हाळी सुट्टी सुरू असल्यामुळे शाळांना सुट्ट्या असल्याने शाळा बंद आहेत. मात्र या दरम्यान शालेय कामकाजासाठी शिक्षक शाळेत येतात. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी येणारे धान्य एक महिला डोक्यावरून वाहून नेत असल्याचा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आल्यावर त्यांनी महिलेस जाब विचारून धान्य परत शाळेत ठेवण्यास भाग पाडले आहे.

दरम्यान शाळेतील एका शिक्षकाने परस्पर या धान्याची विक्री करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून याविषयी गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे. याविषयी शाळेचे मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापन समिती यांनी याबाबत काहीच कल्पना नसल्याचे सांगितले. याबाबत ग्रामस्थांनी पंचायत समिती येथे लेखी तक्रार दाखल केली असून शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत गटशिक्षण अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार याविषयी प्रत्यक्ष शाळेवर जाऊन चौकशी केली जाणार असून शिक्षक दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -