घरपालघरआजारी आरोग्य केंद्राला कंत्राटी कर्मचार्‍यांचे सलाईन

आजारी आरोग्य केंद्राला कंत्राटी कर्मचार्‍यांचे सलाईन

Subscribe

तवा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत तवा, चारोटी, धानीवरी, महालक्ष्मी, कासा, धरमपूर, दह्याळे, वेती, मुरबाड, आदी उपकेंद्रे येतात.

डहाणू: डहाणू तालुक्यातील तवा ग्रामपंचायत हद्दीमध्ये येणार्‍या तवा प्रथमिक आरोग्य केंद्रामध्ये अनेक पदे रिक्त असल्यामुळे आरोग्य केंद्र कंत्राटी कर्मचार्‍यांवर अवलंबून आहे. तवा येथे लाखो खर्च करून सुसज्ज इमारत बांधण्यात आलेली आहे. हे आरोग्य केंद्र रात्रीच्या वेळी सुरु असते.परंतु, अपुरे कर्मचारी असल्याने आरोग्य व्यवस्थेवर ताण पडत आहे.येथील केंद्रामध्ये दोन वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका ही महत्त्वाची पदे ही कंत्राटी स्वरूपात आहेत. तर औषध निर्माता, असिस्टंट लॅब, लिपिक, सफाईगार, कुष्ठरोग तज्ञ आदी पदे ही रिक्त आहेत. या आरोग्य केंद्रात तवा, कोल्हाण, धामटणे, पेठ, घोळ, बर्‍हाणपूर, वेती, मुरबाड, पिंपळशेत, वांगर्जे, चारोटी, या ग्रामीण भागातील रुग्ण तसेच तवा आश्रम शाळेतील विद्यार्थी याच आरोग्य केंद्रात येत असतात.मात्र, अपुरे आरोग्य कर्मचारी असल्याने कर्मचार्‍यांवर ताण आणि रुग्णांची परवड होत असते. तवा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत तवा, चारोटी, धानीवरी, महालक्ष्मी, कासा, धरमपूर, दह्याळे, वेती, मुरबाड, आदी उपकेंद्रे येतात.

सुसज्ज इमारत मात्र सुविधाची कमतरता
तवा प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारत आहे. मात्र येथे मूलभूत सुविधांची वाणवा आहे. आरोग्य केंद्रात रुग्णांना, कर्मचार्‍यांना पिण्याचे पाण्याची, तसेच आरोग्य केंद्रामध्ये रात्रीच्या वेळी कमी दाबाचा विद्युतपुरवठा,परिसरात दिवे आदींची कमतरता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -