घरपालघरसंजय हेरवाडे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त

संजय हेरवाडे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त

Subscribe

विजयकुमार म्हसाळ यांची पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

वसईः संजय हेरवाडे यांची वसई- विरार महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर आणखी चार उपायुक्तांच्याही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसई- विरार महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त आणि सहा उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर राज्य सरकारने महापालिकेत संजय हेरवाडे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. याआधीही हेरवाडे यांनी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी काम केले होते. त्यांच्यासोबत दीपक झिंझाड, गणेश शेटे, प्रियंका राजपूत, अर्चना दिवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विजयकुमार म्हसाळ यांची पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

वसई -विरार महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झालेल्या तत्कालीन उपायुक्त किशोर गवस यांची उल्हासनगर महापालिकेत उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कृषी आणि पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी असलेले किशोर गवस यांची मार्चच्या पहिल्या आठवड्यात अतिरिक्त आयुक्तपदी वर्णी लागल्यानंतर वसई- विरार महापालिकेतच नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, अवघ्या आठवड्याभरातच त्यांची उचलबांगडी झाली होती. आता त्यांची उल्हासनगर महापालिकेत उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वसई- विरार महापालिकेतील उपायुक्त पंकज पाटील आणि तानाजी नरळे यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर डॉ. विजय द्वासे यांची नागपूर महापालिकेत सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. चारुशिला पंडीत यांची लातूर तर नयना ससाणे यांची भिवंडी-निजामपूर महापालिकेत तर संघरत्ना खिल्लारे यांची नवी मुंबई पालिका उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मीरा -भाईंदर महापालिकेतील उपायुक्त मारुती गायकवाड यांची पनवेल महापालिकेत उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर सचिन बांगर यांची मीरा- भाईंदर महापालिकेत नियुक्ती झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -