Eco friendly bappa Competition
घर पालघर वाघोलीत बाळु मामा व विठ्ठल रखुमाई माता मंदिर

वाघोलीत बाळु मामा व विठ्ठल रखुमाई माता मंदिर

Subscribe

वसईः नालासोपारा पश्चिमेकडील वाघोली गावातील प्रसिद्ध शनी मंदिर परिसरात श्री संत सद्गुरू बाळु मामा व श्री विठ्ठल रखुमाई माता मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. फुलारे आळी येथे हे मंदिर आहे. शनी मंदिर परिसरात एका बाजूला गोलाकार चौथरा बांधलेला असून या चौथर्‍याच्या मध्यभागी शनीदेवाची प्रतिकात्मक मूर्ती बसवलेली आहे. या प्रतिकात्मक मुर्तीच्यामागे एक मोठी काळी शिळा ठेवण्यात आलेली आहे. या चौथर्‍याच्या उजव्या बाजूस शनिदेवाचे सुंदर मंदीर बांधण्यात आलेले आहे. मंदिराच्या मुख्य गाभार्‍यात शनीदेवाची काळ्या पाषाणातली सुंदर मुर्ती स्थापित करण्यात आलेली आहे. मंदिर परिसर आध्यात्मिक व ध्यानधारणेसाठीही शांत असावा याचीही काटेकोर काळजी घेण्यात आली असून त्यासाठी ध्यान केंद्राचीही निर्मिती केलेली आहे.

हिंदू धर्मात श्रावण मास हा पवित्र महिना म्हणून ओळखला जातो. श्रावणातल्या प्रत्येक शनिवारी सकाळी श्रीशनिपूजा, होमहवन, महाप्रसाद तसेच येणार्‍या प्रत्येक भाविकांना फुल- झाडांचे वाटप व संध्याकाळी दिपोस्तवाचा नयनरम्य कार्यक्रम केला जात असतो. शनिमंदिरातून भाविकांना दिलेली प्रसादरूपी फुल-झाड म्हणजे पर्यावरणाचे महत्व जाणून झाडे लावा व झाडे जगवा यासाठी राबवलेला सामाजीक उपक्रमच म्हणावा लागेल. शनिमंदिराचे जयवंत फुलारे- नाईक यांनी यासाठी थोडीथोडकी नव्हे तर तब्बल ५ लाखांहूनही अधिक फुले व फळझाडांचे मोफत वाटप करत निर्सगाचा समतोल राखण्यासाठी हातभार लावला आहे. शनिमंदीर व फुलारे ट्रस्टद्वारे आरोग्य व रक्तदान शिबीरे, विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप, खाद्य-नाट्यसंगीत महोत्सव, एकांकीका स्पर्धा , क्रिडा स्पर्धा अशा विविध सामाजिक,धार्मिक व सांस्कृतीक विषय वर्षभर राबवत असतात. बँकेच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी ’ बँक आपल्या दारी’सारखे लोकोपयोगी उपक्रमही केले जातात. मंदिर परिसरात सामवेदी खाद्य पदार्थांचा आस्वाद भाविकांना घेता येतो.या परिसरात श्री संत सद्गुरू बाळु मामा व श्री विठ्ठल रखुमाई माताचे मंदिर उभारण्यात आले आहे. दर अमावस्येला बाळु मामांच्या नावाने भंडारा असतो.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -