घरपालघरप्रसिद्ध डॉक्टर ढेडीया यांचे दुःखद निधन

प्रसिद्ध डॉक्टर ढेडीया यांचे दुःखद निधन

Subscribe

टॉप मोस्ट डॉक्टरांइतकी बुद्धिमत्ता असूनही आदिवासी बहुल भागातील लोकांना वैद्यकीय सेवा दिली.

सफाळे: सफाळेसारख्या ग्रामीण भागामध्ये सुमारे 50 वर्षांहून अधिक काळ वैद्यकीय सेवा देणारे, अत्यंत हुशार, प्रामाणिक, शिस्तप्रिय डॉ. ढेडीया यांचे नुकताच गुजरातमध्ये अल्पश्या आजाराने निधन झाले.
स्वतःचे करिअर मुंबईसारख्या शहरी भागातून घडवून सर्व सुखं पायाशी लोळण घालू शकेल अशी परिस्थिती असताना देखील सफाळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा दिल्यानंतर गावकर्‍यांनी याच गावात क्लिनिक काढण्यासाठी जागा दिली. सर्वकाही सहकार्य केले व डॉक्टरांना थांबवून घेतले. त्यांना अपार प्रेम व सन्मान दिला. टॉप मोस्ट डॉक्टरांइतकी बुद्धिमत्ता असूनही आदिवासी बहुल भागातील लोकांना वैद्यकीय सेवा दिली.

डॉक्टरांच्या हाताला प्रचंड गुण होता. त्यांच्याकडे गेलेला पेशंट कितीही आजारी असला तरी फार तर दोन दिवसांत बरा होत असे. त्यांचे गुजराथी, मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांवर प्रभुत्त्व होते. डॉक्टर इथल्या मातीत अक्षरश: मिसळून गेले होते. आजची नवीन पिढी कदाचित त्यांना ओळखणार नाही किंवा त्यांचे सफाळेकरांसाठी जडलेले नाते समजणार नाही. पण जे येथील मूळ निवासी आहेत, त्यांना डॉ. ढेडीया आज या जगात नाहीत, हे कळले तर अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. “डॉक्टर, तुम्ही आमच्या सदैव स्मरणात रहाल. आजही आम्ही सफाळेकर तुमच्या ऋणात आहोत.” असाच काहीसा सुर सफाळेवासियांत दिसून येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -