घरपालघरसावरखंड-नांदगाव उड्डाणपूल मागणी प्रलंबित

सावरखंड-नांदगाव उड्डाणपूल मागणी प्रलंबित

Subscribe

या मागणीला दाद देत आयआरबीकडून हिरवा कंदील ( मंजुरी ) मिळून निधी उपलब्ध झाला . मात्र प्रत्यक्षात कामाला सुरूवात झालेली नाही.

बोईसर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्यातील विरार ते तलासरी या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. महामार्ग ओलांडताना अनेक अपघातही झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मनोरजवळील सावरखंड व नांदगाव या दोन ठिकाणी उड्डाणपूल बांधावा, अशी मागणी २०१४ च्या सुमारास आयआरबीकडे खासदार गावित यांनी केली होती. या मागणीला दाद देत आयआरबीकडून हिरवा कंदील ( मंजुरी ) मिळून निधी उपलब्ध झाला . मात्र प्रत्यक्षात कामाला सुरूवात झालेली नाही.
खासदार गावीत यांनी मार्च २०२२ मध्ये लवकरच काम सुरू करणार असे आश्वासन दिले होते. उड्डाणपूल व्हावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून स्थानिकांकडून मागणी करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व आयआरबी या कंत्राटदार कंपनीने याकडे दुर्लक्ष केल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.बोईसर औद्योगिक वसाहत, तारापूर अणुप्रकल्प, गुजरातमधील वापी येथील औद्योगिक वसाहत या प्रकल्पांमुळे राष्ट्रीय महामार्गावर दररोज लाखो मोठमोठी वाहने ये-जा करीत असतात. या महामार्गालगत मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असून मनोर, विक्रमगड, जव्हार, त्र्यंबकेश्वर, नाशिककडे जाण्यासाठी सावरखंड येथील महामार्ग ओलांडून जावे लागते. त्यामुळे येथे उड्डाणपूल व्हावा, अशी मागणी केली जात आहे. येथून जवळच नांदगाव भागातही मनोर-पालघरच्या पश्चिम भागात जाण्यासाठी उड्डाणपूल बांधण्याची मागणी केली जात
आहे.

राष्ट्रीय महामार्गावर मनोर तर्फे नांदगांव येथे पूर्व-पश्चिम या दोन्ही बाजूला मोठी लोकवस्ती आहे. मनोर ही मोठी बाजारपेठ असल्यामुळे नेहमीच येथे वर्दळ असते. येथून अनेक शाळकरी मुले व ग्रामस्थ ये-जा करत असतात. उड्डाणपूल नसल्यामुळे या ठिकाणी अनेक निष्पाप बळी गेले आहेत. उड्डाणपूल झाला नाही, तर येत्या काळात ’रास्ता रोको’ करू.
– पवन सवरा, सरपंच,
मनोर तर्फे नांदगाव

- Advertisement -

नांदगांव , विक्रमगड फाटा, आच्छाड (अंडरपास) उड्डाणपूल सेक्शन झाले आहे . निविदा मागवल्या आहेत . निविदा उघड करून स्वीकारल्यानंतर येत्या दोन तीन महिन्यात काम चालू केले जाईल.तसेच लवकरात लवकर काम केले जाईल.
– मुकुंद अत्तरदे
प्रकल्प संचालक

निधी धूळ खात ?
मार्च २०२२मध्ये जवळपास अंदाजे ४ कोटी ८० लाख निधी उपलब्ध झाला. आयआरबी कंपनीकडून खासदार राजेंद्र यांच्या प्रयत्नाने हा निधी उपलब्ध केला आहे. त्यानंतर मागणी करण्यात आलेला या महामार्गावरील ढेकाळे येथील पूल बांधून झाला. मात्र सावरखंड व नांदगाव येथील पुलाबाबत वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -