भाईंदर : मीरारोड पूर्व परिसरात सार्वजनिक रस्त्यावर हेल्मेट परिधान न करता स्कुटीच्या हँन्डलवर उलटा बसून हलगर्जीपणाने व निष्काळजीपणे स्कुटी चालवून स्टंट करणार्याचा शोध घेऊन त्याच्यावर वाहतूक पोलिसांच्या मार्फत कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२९, १८४ नुसार कारवाई करण्यात आली आहे.मीरारोड पूर्व परिसरात बॅक रोड नयानगर परिसरात हेल्मेट परिधान न करता स्कुटीच्या हँन्डलवर उलटा बसून स्कुटी हलगर्जीपणाने आणि निष्काळजीपणे धोकादायकरित्या चालवत स्टंट करत असतानाचा व्हीडीओ सोशल मीडियावर वायरल झाला होता.त्यानंतर वरिष्ठ अधिकार्यांच्या आदेशानुसार वाहतूक पोलिसांनी ’ई -चलन’ मशिनद्वारे स्टंट करणार्या व्यक्तीचे नाव व मोबाईल नंबर याचा शोध घेतला. त्यानंतर शनिवारी स्टंट करणारा त्याच्या राहत्या परिसरात मिळून आला. त्याला स्कूटीवर स्टंट केल्या बाबत विचारल्यावर त्याने त्याची चूक कबूल केली. त्यानंतर पोलिसांनी वाहतूक कायदा तोडणार्या आणि स्टंट करणार्या व्यक्ती विरोधात नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत कारवाई केली आहे. या घटनेनंतर वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर होणार्या धोकादायक स्टंट विरोधात कडक कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनी नागरिकांना वाहतूक नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.
Scooter Stunts:स्कुटीवरून स्टंट करणार्यावर वाहतूक पोलिसांची कारवाई
written By My Mahanagar Team
या घटनेनंतर वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर होणार्या धोकादायक स्टंट विरोधात कडक कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनी नागरिकांना वाहतूक नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -