घर पालघर मोखाड्यात दुसरी ईर्शाळवाडी ?

मोखाड्यात दुसरी ईर्शाळवाडी ?

Subscribe

त्यामुळे अशा जंगलातील डोंगर कपारीत राहणार्‍या शेतकर्‍यांना धोकादायक ठिकाणी राहण्यापासून स्थानिक प्रशासनाने सावध करणे गरजेचे आहे.

मोखाडा:  डोंगरावरील माती, दरड यांचे भुसखल्लन होऊन होत्याचे नव्हते झालेल्या माळीण, ईर्शाळवाडी, तळीये या गावांसारखी मोखाडा तालुक्यातही असंख्य गाव आहेत.जी डोंगराच्या पायथ्याशी वसलेली असल्याने आपल्या कुटुंबासह मृत्यूच्या छायेखाली राहत आहेत. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने उपाययोजना करण्याची गरज आहे. दुर्दैवी घटना घडायला या भागांतही वेळ लागणार नाही. तालुक्यातील करोळी, पासोडीपाडा, वागंणपाडा, बिवलपाडा या गावांसह तालुक्यातील अशीही काही शेतकरी कुटूंबे आहेत, की जी पावसाळ्यातील चार महिन्यांची शेती करण्यासाठी डोंगर कपारीच्या कुशीत आपल्या कुटुंबासह मृत्यूच्या छायेखाली राहतात. त्यामुळे अशा जंगलातील डोंगर कपारीत राहणार्‍या शेतकर्‍यांना धोकादायक ठिकाणी राहण्यापासून स्थानिक प्रशासनाने सावध करणे गरजेचे आहे.

ज्यामुळे भविष्यातील अनुचित घटना टाळता येईल.पावसाळ्यात डोंगर दरीच्या भागात पाऊस पडण्याचे प्रमाण अधिक राहत असल्याने डोंगरावरील माती, दरड खचून भूस्खलन होण्याची शक्यता अधिक आहे.त्यामुळे डोंगर कपारीच्या कुशीत व पायथ्याशी वसलेल्या गावात होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागणार नाही.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -