घरपालघरविकसित भारत संकल्प यात्रेचा दुसरा टप्पा

विकसित भारत संकल्प यात्रेचा दुसरा टप्पा

Subscribe

पहिल्या टप्प्यात शहराच्या ९ प्रभागातील ४९ शिबिरांमध्ये २० हजारांहून अधिक नागरिक उपस्थित होते. त्यात ९ हजार ३४० पुरूष तर १० हजार ८९३ महिलांचा समावेश होता. तर हजारो नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घेतला होता.

वसईः केंद्र शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘विकसित भारत संकल्प’ यात्रेचा दुसरा टप्पा येत्या सोमवारपासून सुरू होणार आहे. ५ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२४ या काळात वसई विरार शहरातील ९ प्रभागात ही यात्रा फिरणार आहे. नोव्हेंबर महिन्यात वसईत सुरू झालेल्या या यात्रेच्या पहिल्या टप्प्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे योजनेचा दुसरा टप्पा आयोजित करण्यात आला आहे.केंद्राच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवून त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. २८ नोव्हेंबर ते २२ डिसेंबर २०२३ या कालावधीत या योजनेचा पहिला टप्पा महापालिका क्षेत्रात सुरू झाला होता.पहिल्या टप्प्यात शहराच्या ९ प्रभागातील ४९ शिबिरांमध्ये २० हजारांहून अधिक नागरिक उपस्थित होते. त्यात ९ हजार ३४० पुरूष तर १० हजार ८९३ महिलांचा समावेश होता. तर हजारो नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घेतला होता.

या योजनेत नागरिकांना तात्काळ आधार कार्ड, आयुष्यान भारत कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे. याशिवाय महिलांना उज्वला गॅस योजना तसेच फेरीवाल्यांना पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत कर्जे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. याशिवाय आरोग्य शिबिरात मोफत तपासणी केली जाणार असून मोफत औषधे दिली जाणार आहेत. महापालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली योजनेचा पहिला टप्पा आयोजित करण्यात आल्यामुळे नागरिकांची कुठलीच गैरसोय झाली नव्हती. सर्व ठिकाणी परिपूर्ण व्यवस्था करण्यात आली होती.यावेळी देखील अशाच पध्दतीने विकसित भारत संकल्प यात्रेचे चांगले नियोजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे वसई विरार मधील नागरिकांनी या यात्रेला भेट देऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन या योजनेचे समन्वय अधिकारी आणि उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी केले आहे. यात्रेदरम्यान होणार्‍या कार्यक्रमस्थळांची माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

०००

पहिल्या टप्प्यातील लाभार्थी

- Advertisement -

 

एकूण शिबिरे – ४९

आधार कार्ड – १ हजार ६२०

आयुष्यमान भारत कार्ड – ५ हजार ७४०

पंतप्रधान स्वनिधी कर्जे – ७४९

उज्वला गॅस – ७४२

आरोग्य शिबिरात – ४ हजार ३५७

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -