वसईत लसीकरण केंद्रात ज्येष्ठ नागरीकाचा मृत्यू ?

everyone above 18 years of age is likely to get corona vaccine in Pune
वसई विरार महापालिकेच्या आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी गेेलेल्या ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरीकाचा चक्कर येऊन खाली पडल्याने मृत्यू झाल्याची घटना उजेडात आली आहे. ही घटना नालासोपारा शहरातील पाटणकर पार्क येथील लसीकरण केंद्रात शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. पाटणकर परिसरात राहणारे हरीशभाईंद पांचाळ (वय ६३) याच ठिकाणी असलेल्या महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लस घेण्यासाठी गेले होते. नाव नोंदणीसाठी ते रांगेत उभे होते. त्यानंतर अचानक चक्कर येऊन पांचाळ खाली कोसळले. याठिकाणी प्राथमिक उपचाराचा सोय नसल्याने पांचाळ यांना हॉस्पीटलमध्ये न्यायचे होते. पण, केंद्रात रुग्णवाहिकाही उपलब्ध नव्हती.
एक रुग्णवाहिका होती. पण. ती डॉक्टरांना ने-आण करण्यासाठी असल्याने ती देण्यास कर्मचारी नकार देत होते. तेव्हा काही नागरीकांनी तेथील कर्मचाऱ्यांवर दबाव आणून रुग्णवाहिकेची व्यवस्था केली होती. पण, त्यात ऑक्सीजनची व्यवस्था नव्हती. या गदारोळात पांचाळ यांनी जवळच्या  महा पालिकेच्या रुग्णालयात नेण्यात आले. पण, तेथे पोचल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते  अड. निमेश वसा यांनी केला आहे. महापालिकेच्या लसीकरण केंद्रात कोणत्याही प्राथमिक सुविधा नाही. रुग्णांवर  असा प्रसंग आल्यावर जीव गमवावा लागणार आहे. असेही वसा यांनी सांगितले.
रुग्णाला आधीच मधुमेहाचा त्रास होता.  रुग्णाला ताबडतोब उपचारासाठी हलवण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेविरोधातील आरोप खोटे आहे. महापालिकेच्या  सर्व आरोग्य केंद्रावर रुग्णवाहिका आणि ऑक्सिजन सुविधा उपलब्ध आहेत. – डॉ. सुरेखा वाळके , मुख्य वैद्यकीय अधिकारी