Eco friendly bappa Competition
घर पालघर महापालिका आयुक्तांनी भाकरी फिरवली

महापालिका आयुक्तांनी भाकरी फिरवली

Subscribe

यासाठी ५ उपायुक्तांना या प्रभागाचे उपायुक्त परिमंडळ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. यापूर्वी असलेल्या प्रभागांचे नियंत्रण अधिकारी म्हणून असलेले पद काढून घेण्यात आले आहे.

वसईः वसई -विरार महापालिकेच्या उपायुक्तांच्या खातेनिहाय बदल्या करण्यात आल्या असून यापूर्वी असलेल्या प्रभागांच्या नियंत्रण अधिकारी म्हणून असलेले उपायुक्तांचे पद रद्द करण्यात आले आहे. त्याऐवजी पाच परिमंडळ तयार करण्यात आली असून प्रत्येक उपायुक्तांकडे दोन परिमंडळाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी अंतर्गत फेरबदल केले असून दोन प्रभागांचे मिळून एक असे एकूण ५ परिमंडळे तयार केली आहेत. यासाठी ५ उपायुक्तांना या प्रभागाचे उपायुक्त परिमंडळ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. यापूर्वी असलेल्या प्रभागांचे नियंत्रण अधिकारी म्हणून असलेले पद काढून घेण्यात आले आहे.

उपायुक्त विजयकुमार द्वासे वैद्यकीय आरोग्य विभागात ठाण मांडून बसले होते. त्याठिकाणाहून त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांना परिमंडळ चारची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यात वालीव आणि नवघर-माणिकपूर प्रभाग समितीचा समावेश आहे. उपायुक्त चारुशिला पंडित यांच्याकडे वैद्यकीय आरोग्य विभाग सोपवण्यात आला आहे. अजित मुठे यांच्यावर परिमंडळ एकची जबाबदारी सोपवण्यात आली असून त्यात बोळींज प्रभाग समिती आणि चंदनसार प्रभाग समितीचा समावेश आहे. परिमंडळ दोनची जबाबदारी सदानंद पुरव यांच्याकडे देण्यात आली असून त्यात विरार पूर्व प्रभाग समिती आणि नालासोपारा पश्चिम प्रभाग समितीचा समावेश आहे. परिमंडळ तीनच्या उपायुक्तपदी विशाखा मोटघरे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यात आचोळे आणि धानिव-पेल्हार प्रभाग समितीचा समावेश आहे. सागर घोलप यांची परिमंडळ पाचच्या उपायुक्त पदी नियुक्ती करण्यात आली असून त्यात वसई प्रभाग समितीचा समावेश आहे. संबंधित प्रभागांचे सहाय्यक आयुक्त उपायुक्तांच्या अखत्यारीत काम करतील. उपायुक्त किशोर गवस, चारुशीला पंडित, नानासाहेब कामठे, तानाजी नरळे, पंकज पाटील या उपायुक्तांकडील प्रभागांचे नियंत्रण अधिकारी म्हणून असलेली जबाबदारी काढून घेण्यात आली आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -