Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर पालघर गटाराचे पाणी रस्त्यावर; पादचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात

गटाराचे पाणी रस्त्यावर; पादचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात

पालघर नगरपरिषदेच्या अख्त्यारितील नवली रेल्वे फाटक परिसरातील मुख्य गटारातील पाणी थेट मुख्य रस्त्यावर आल्याने संपूर्ण रस्त्यालाच गटाराचे स्वरूप आले आहे. त्यामुळे या गटारातील रस्त्यावरून प्रवास करणार्या पादचार्‍यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

Related Story

- Advertisement -

पालघर नगरपरिषदेच्या अख्त्यारितील नवली रेल्वे फाटक परिसरातील मुख्य गटारातील पाणी थेट मुख्य रस्त्यावर आल्याने संपूर्ण रस्त्यालाच गटाराचे स्वरूप आले आहे. त्यामुळे या गटारातील रस्त्यावरून प्रवास करणार्या पादचार्‍यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. कोरोना प्रहर काळ सुरू असल्याने आरोग्याबाबत पालघर नगरपरिषद प्रशासन सतर्क नसल्याचे चित्र समोर आले आहे. शहराला पश्चिमेकडून पुर्वेला जोडण्यासाठी उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे तेथे रस्त्याची रुंदीकरण कमी झाली आहे. या ठिकाणाहून पादचार्यांना आपला जीव मुठीत घेउन येथून प्रवास करावा लागत आहे. मागील काही दिवसांपूर्वी याच घाणयुक्त सांडपाणी साचलेल्या रस्त्यावरून प्रवास करताना नवली आणि लोकमान्यनगर येथील पादचारी पाण्यात पडले होते. याची दखल नगर परिषद प्रशासनाने घेतलेली नाही.

नगर परिषदेचे आरोग्य विभागाचे प्रमुख उमाकांत पाटील यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, उड्डाणपुलाचे जेथे काम सुरू आहे. तेथे असलेल्या बंदिस्त गटारातील पाणी जवळच उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलासाठीचे कॉलममुळे बाधित झाले आहे. बांधण्यात आलेल्या गटारातील क्रॉसिंग पाईप तुबल्याने गटारातून वाहणारे पाणी तेथेच अडले गेले आहे. त्यातील घाण आणि दुर्गंधयुक्त पाणीथेट रस्त्यावर आल्याने वाहतूक आणि पादचार्‍यांना यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. त्यावर तोडगा काढण्याचा काम हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख उमाकांत पाटील यांनी दिली.

- Advertisement -

नागरीकांना होणारा त्रास समजू शकते. यावर आरोग्य कर्मचार्‍यांना तातडीने तुंबलेले पाणी काढून परिसर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
– डॉ. उज्वला काळे, नगराध्यक्षा

नवलीफाटकपरिसरातील तुबलेल्यागटाराबाबत माहिती मिळाली आहे. त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात येईल.
– स्वाती देशपांडे, मुख्यधिकारी, नगरपरिषद, पालघर

- Advertisement -