Eco friendly bappa Competition
घर पालघर पोलीस भरती प्रशिक्षण वर्गात येणार्‍या मुलींचे लैंगिक शोषण

पोलीस भरती प्रशिक्षण वर्गात येणार्‍या मुलींचे लैंगिक शोषण

Subscribe

यातील एका पिडीत मुलीने तक्रार केल्यानंतर नालासोपारा पोलिसांनी पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून समाधान गावडे आणि अनुजा शिंगाडे या दोघांना अटक केली आहे.

वसईः वसई रेल्वे पोलीस दलात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी नालासोपारा शहरात पोलीस भरती प्रशिक्षण वर्गात येणार्‍या अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करत असल्याची आणि त्याला रेल्वे पोलीस दलात कार्यरत महिला पोलीस साथ देत असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. नालासोपारा पोलिसांनी पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली आहे.अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. समाधान गावडे (२८) आणि अनुजा शिंगाडे (२५) अशी त्यांची नावे आहेत. समाधान गावडे नालासोपारा शहरात पोलीस दलात प्रशिक्षण देणारी विजयी भव नावाची पोलीस अकादमी चालवतो. याठिकाणी अल्पवयीन मुले-मुली प्रशिक्षणासाठी येतात. समाधान गावडे प्रशिक्षणासाठी येणार्‍या मुलींशी अश्लिल संभाषण, मोबाईलवर मेसेज, लैंगिक शोषण करत असल्याच्या तक्रारी आहेत. समाधान गावडेच्या या कृत्याला अनुजा शिंगाडे उत्तेजन देऊन तीही यात सामील असल्याचाही पिडीतांचा आरोप आहे. यातील एका पिडीत मुलीने तक्रार केल्यानंतर नालासोपारा पोलिसांनी पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून समाधान गावडे आणि अनुजा शिंगाडे या दोघांना अटक केली आहे.

 

- Advertisement -

चुकीच्या ठिकाणी स्पर्श करत असल्याचा आरोप

क्लासमध्ये शिकवण्याच्या नावाखाली आरोपी हा मुलींच्या शरीराला चुकीच्या ठिकाणी स्पर्श करत असल्याचा आरोप आहे. मुलींचा पाठलाग करत त्यांच्या घरी जाऊन त्यांना फिरायला बोलवत होता.पीडित मुलीचे व्हॉट्सअप स्कॅन करुन आरोपी गावडेने आक्षेपार्ह संभाषण केले होते. आरोपीची मैत्रीण हीसुद्धा पोलीस असून तिने देखील त्याला यामध्ये मदत केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.क्लासमध्ये आपल्या सोबत घडलेला प्रकार असह्य झाल्याने पीडित मुलीने क्लासला जाणे बंद केले व मानसिक त्रास झाल्याने तिने ही गोष्ट तिच्या कुटुंबीयांना सांगितली. पीडित मुलींनी या प्रकरणी नालासोपारा पोलीस ठाणे गाठत आरोपी विरोधात तक्रार दाखल केली.

- Advertisement -

 

- Advertisment -