घरपालघरशिवसेनेच्या सरपंच, सदस्यांसह कार्यकर्ते बविआत सामील

शिवसेनेच्या सरपंच, सदस्यांसह कार्यकर्ते बविआत सामील

Subscribe

यावेळी बविआचे तालुकाध्यक्ष नगरसेवक अमजद अन्सारी, जव्हार तालुकाध्यक्ष एकनाथ दरोडा उपस्थित होते. यावेळी लवकरच मोखाडा भागात एक बैठक घेणार असल्याचे तालुकाध्यक्ष अन्सारी यांनी यावेळी सांगितले.

मोखाडा: मोखाडा तालुक्यातील शिवसेना (शिंदे गट) मध्ये अंतर्गत धुसफूस थांबण्याचे नाव घेत नसून या आधी अनेक महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता यानंतर लागलीच काही युवकांनी राष्ट्रवादी शरद पवार या पक्षात प्रवेश केला होता. यानंतर आता तालुक्यातील काष्टी सावर्डे ग्रामपंचायतीच्या सरपंच गौरी बोटे त्यांचे पती रमेश बोटे यांनी अनेक कार्यकर्त्यांसह बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार राजेश पाटील, जिल्हाध्यक्ष काशिनाथ पाटील, माजी खासदार बळीराम जाधव यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. हा प्रवेश केल्याने शिवसेनेला अजून एक धक्का बसलेला आहे.यावेळी बविआचे तालुकाध्यक्ष नगरसेवक अमजद अन्सारी, जव्हार तालुकाध्यक्ष एकनाथ दरोडा उपस्थित होते. यावेळी लवकरच मोखाडा भागात एक बैठक घेणार असल्याचे तालुकाध्यक्ष अन्सारी यांनी यावेळी सांगितले.

सध्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल कधीही वाजू शकते अशी स्थिती आहे. अशातच मोखाडा तालुक्यात मात्र पक्ष बदलाचे वारे जोरात वाहत आहेत. या आधीही शिवसेनेचे माजी सरपंच तालुका संघटक अशा प्रमुख कार्यकर्त्यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामुळे तात्काळ शिवसेनेने प्रभावीपणाने गळती रोखणे आवश्यक होते. मात्र पक्षातील कार्यकर्ते यांना देण्यात येणार्‍या कामामध्ये अन्याय झाल्याचे तसेच ग्रामपंचायतीमध्ये करावयाची विकास कामे यावरून अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यामध्ये खटके उडत असल्याचे बोलले जात होते. यातूनच रमेश बोटे यांनी थेट बविआमध्ये प्रवेश केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मुळात राज्यात जिल्हयात आणि तालुका पंचायत समितीमध्ये शिवसेनेची सत्ता असतानाही पदाधिकारी मात्र सोडून जात असल्यामुळे ही गळती रोखण्याचे मोठे आव्हान शिवसेनेसमोर उभे राहिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -