घरपालघरमोखाडा जल ’जीवनचे ’ आयुष्य  कमी

मोखाडा जल ’जीवनचे ’ आयुष्य  कमी

Subscribe

त्या ऐवजी चक्क अ‍ॅल्युमिनियमच्या टाक्या बांधण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यामुळे जल जीवनचे आयुष्य कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मोखाडा : राज्यभरातील पाणी टंचाई मिटवण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. यासाठी गावोगावी प्रत्येक गावांसाठी एक स्वतंत्र योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. मात्र या सर्वांपेक्षा मोखाडा तालुक्यातील योजना वेगळी आहे. कारण अप्पर वैतरणावरून पाणी घेतल्याने वैतरणा ते गावापर्यंत पाणीपुरवठा करणे, दोन- चार गाव मिळून एक पाणी टाकी बांधणे, इथपर्यंतच तब्बल २५० कोटींच्या आसपासचे काम एकाच कंपनीला देण्यात आले आहे. याशिवाय कामांची रक्कम जास्त असल्याने या कामावर नियंत्रणही पाणी पुरवठा विभाग ऐवजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे आहे. टाकी ते घराघरात नळ पोहचविण्याचे काम पाणीपुरवठा विभाग करणार आहे. असे असले तरी टाकीपर्यंत पाणी येणे आणि टाकीत टिकून राहणे हे अतिशय महत्त्वाचे असून सुरूवातीला आरसीसी टाकी बांधण्याचे योजनत नमूद असताना आता त्या ऐवजी चक्क अ‍ॅल्युमिनियमच्या टाक्या बांधण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यामुळे जल जीवनचे आयुष्य कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

तालुक्यातील पाणी टंचाई दूर करण्याकामी तब्बल ५०० कोटींच्या आसपास खर्च होणार आहे. यातील २५० कोटींची कामे ईगल नावाच्या कंपनीला दिली आहेत. याची देखरेख महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग करत आहेत. सुरूवातीला रस्त्यांच्या कडेला केलेल्या खोदकामामुळे ही कंपनी वादात सापडली होती. पाईप जोडणी पूर्ण झाल्यानंतर आता पाणी टाकी बांधण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. सुरूवातीला या टाक्यांची कामे आरसीसीत होणार होती. मात्र आता चक्क अ‍ॅल्युमिनियमच्या टाक्या बसवल्या जात आहेत.  मुळात अशा योजना वारंवार होणार नाहीत. यामुळे आताच शाश्वत काम होणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु, अंदाजपत्रकात नेमका बदल कोणी व का केला? आरसीसी बांधकाम न करता अ‍ॅल्युमिनियमचां फंडा कोणी काढला? याची आता चौकशी होणे गरजेचे असे नागरिकांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

टाक्यांचे आयुष्य कमी

या योजनेचे राज्यभर काम सुरू आहे .पालघर जिल्हयात प्रत्येक तालुक्यात ही कामे सुरू आहेत. मात्र सर्व योजनांत टाकी बांधकाम आरसीसी आहेत. मग मोखाडा तालुक्यात अ‍ॅल्युमिनियम का हा प्रश्न आहे. याचे उत्तर प्रशासनाने देणे गरजेचे आहे. यामुळे ठेकेदारांच्या भल्यासाठी शासनाने हा फंडा काढला की काय अशी चर्चा होताना दिसत आहे. यामुळे असाच हा कारभार रेटून नेला गेला, तर या योजनांचे आयुष्य कमी होईल हे नक्की. कारण आरसीसी टाकी बांधकामाची किमान ४० वर्षे गॅरंटी धरली जाते. मात्र झिंक अ‍ॅल्युमिनियम टाकीची फक्त १० वर्ष गॅरंटी असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -