घरपालघरशुssss! महापालिकेची आरोग्ययंत्रणा झोपलीय !

शुssss! महापालिकेची आरोग्ययंत्रणा झोपलीय !

Subscribe

कोरोना काळात खाजगी रुग्णालयांवर आरोग्य विभागाचा विशेष लोभ असल्याचे दिसून आले होते. जादा बिल आकारणार्‍या रुग्णालयांवर कारवाई करण्यासही आरोग्य खात्याकडून टाळाटाळ केली गेली होती.

वसई : वसई -विरार महापालिकेच्या एका नागरी आरोग्य केंद्रात पेशंट नसल्याने डॉक्टर चक्क झोपा काढत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे. वसई पूर्वेकडील नवघर येथील नागरी आरोग्य केंद्रात डॉक्टर ड्युटीच्यावेळीच पेशंट नसल्याने टेबलावर डोके ठेऊन थेट झोपी गेल्या आहेत. पेशंट नसल्यानेच डॉक्टर झोपी जातात, असे चित्र असले तरी महापालिका प्रशासनाच्या उदासिनतेमुळे अनेक गैरसोयी असल्यानेच पेशंट नागरी सुविधा केंद्रात जात नसल्याचे वास्तव आहे. काही अपवाद वगळता महापालिकेच्या आरोग्य विभागात सध्या अनागोंदी कारभार पहायवयास मिळत आहे. कोरोना काळात खाजगी रुग्णालयांवर आरोग्य विभागाचा विशेष लोभ असल्याचे दिसून आले होते. जादा बिल आकारणार्‍या रुग्णालयांवर कारवाई करण्यासही आरोग्य खात्याकडून टाळाटाळ केली गेली होती.

दरम्यान, महापालिकेच्या सेवेत कंत्राटी पध्दतीवरच डॉक्टर कार्यरत आहेत. यातील अनेकांचे खासगी रुग्णालये, डॉक्टर, लॅब यांच्याशी लागेबांधे असल्याचा आरोप होत आहे. तर काही डॉक्टर खासगी रुग्णालयात अप्रत्यक्ष भागिदारही असल्याची चर्चा आहे. पण, त्यावर प्रशासन कोणतीही कार्यवाही करताना दिसत नाही. नागरी सुविधा केंद्रांमध्ये औषधांचा तुटवटा, सोयी सुविधांचा अभाव, रुग्णाला खासगी रुग्णालयात जाण्याचा दिला जाणारा सल्ला याचमुळे पेशंट खाजगी रुग्णालयाकडे जाताना दिसतात.परिणामी अनेक नागरी सुविधा केंद्रांमध्ये पेशंट जाणे टाळतात, असे दिसून आले आहे. सध्या डॉक्टर झोप काढत असलेल्या फोटोतून हेच सिध्द होते. गेल्या दोन महिन्यांपूर्वी नालासोपार्‍यातील रुग्णालयातील डॉक्टरच्या हस्ताक्षरातील प्रिस्क्रीप्शन वायरल झाली आहे. त्यात सदर डॉक्टरने विशिष्ठ नावाचे, विशिष्ठ कंपनीचेच औषध विकत घेण्याचे पेशंटला लिहून दिल्याचे दिसून आले होते. ही प्रिस्क्रीप्शन वायरल झाल्यानंतर त्या डॉक्टरपेक्षा खाजगी डॉक्टरांच्याच पोटात गोळा उठला होता. त्या डॉक्टरची वकिल करण्यासाठी खाजगी डॉक्टर सरसावले होते. भाजपचे पदाधिकारी अशोक शेळके यांनी त्या प्रिस्क्रीप्शनमधील हस्ताक्षराची तज्ञांकडून तपासणी करण्याची मागणी आयुक्तांकडे केली होती. त्यानंतर प्रकरण थंड झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -