घरपालघरमनसेचा मुख्याधिकाऱ्यांना घेराव; समस्या मार्गी लावण्यासाठी आंदोलन

मनसेचा मुख्याधिकाऱ्यांना घेराव; समस्या मार्गी लावण्यासाठी आंदोलन

Subscribe

पालघर नगरपरिषद हद्दीतील प्रलंबित जीवघेण्या समस्यांचा जाब विचारण्यासाठी मनसैनिकांनी मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालून आंदोलन करण्यात आले.

पालघर नगरपरिषद हद्दीतील प्रलंबित जीवघेण्या समस्यांचा जाब विचारण्यासाठी मनसैनिकांनी मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालून आंदोलन करण्यात आले. पालघर नगरपरिषदमधील समस्यांनी आता डायनासोरसचे रूप घेतले असून, या नरकरूपी परिस्थितीला सर्वस्वी नगरपरिषदेचे ढिम्म प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. भ्रष्टाचार मोडून काढण्याचे आश्वासने देऊन सत्तेत आलेलेच आज मात्र टक्केवारीच्या भ्रष्टाचारात नखशिखांत बुडाली आहेत, असा आरोप जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांनी यावेळी केला. ठेकेदार आणि नगरपरिषद प्रशासन यांच्या अजब भ्रष्ट रसायनामुळे सर्वसामान्य जनता आज मूलभूत नागरी सोयी-सुविधांपासून दूर आहे. सर्वसामान्य जनतेला रोज जीवघेण्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप शहराध्यक्ष सुनील राऊत यांनी यावेळी केला.

सुसज्ज मच्छी मार्केट, मोकाट जनावरे-कोंडवाडा, वाहनतळ, पी १ पी २ पार्किंग, नादुरुस्त रस्ते आणि गटारे, ठेकेदारांकडून सुमार आणि निकृष्ट दर्जाची कामे, फुटपाथवरील अतिक्रमण, उघड्यावरील खाद्य पदार्थ, अनधिकृत बांधकामे, अनधिकृत हातगाडी आणि फेरीवाले, औषध फवारणी, कचरा संकलन आणि वहन इत्यादी समस्यांबाबत मुख्याधिकारी आणि उपस्थित अधिकारी वर्गाला मनसेच्या स्टाईलने जाब विचारण्यात आला. यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी मनसे शिष्टमंडळास यावर लवकरच उपाययोजना करू, असे आश्वस्त केले आहे. मनसेच्या आंदोलनाच्या धास्तीने पालघर नगरपरिषदेत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

- Advertisement -

जिल्हा सचिव दिनेश गवई, उपचिटणीस सुनील पाटील, शहर अध्यक्ष सुनील राऊत, उपाध्यक्ष हेमंत घोडके, मिथुन चौधरी, निशांत धोत्रे, शिवा यादव, विभाग अध्यक्ष नयन पाटील, निखिल पामाळे, अक्षय कोकणे, विशाल पवार, सिद्धेश महाले, अतिश मोरे, अमोल वारे, मयूर पाटील, अनिल चव्हाण आदी पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.

हेही वाचा –

निवडणूकजीवी केंद्र सरकार देशातील रोजगाराचा प्रश्न सोडवण्यात अपयशी, राष्ट्रवादीचा भाजपवर निशाणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -