घरपालघरनालासोपारा येथून सहा टन प्लास्टिक जप्त

नालासोपारा येथून सहा टन प्लास्टिक जप्त

Subscribe

सहाय्यक आयुक्त सुकदेव दरवेशी यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल सहा टन प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले.

वसई: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एकल प्लास्टिकविरोधातील मोहीम वसई-विरार महापालिकेने तीव्र केली आहे. या मोहिमेंतर्गत महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या आदेशानुसार महापालिका प्रभाग समिती ‘डी’ मधील महावीर धाम सोसायटीत धडक कारवाई करण्यात आली. सहाय्यक आयुक्त सुकदेव दरवेशी यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल सहा टन प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले.

नालासोपारा-आचोळे येथील महावीर धाम सोसायटीतील गोदामात दुकान मालक विनोद माळी यांनी प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा करून ठेवला असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त सुकदेव दरवेशी यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी या दुकानाची पाहणी केली. अधिकच्या तपासणीत 235 मोठ्या पिशव्यांत 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या, चमचे इत्यादी साहित्य आढळले. बाजारात या प्लास्टिकची अंदाजित किंमत आठ लाख रुपये इतकी असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

रितसर पंचनामा केल्यानंतर हे प्लास्टिक जप्त करण्यात आले. शिवाय दुकान मालक विनोद माळी यांच्याकडून 10 हजार रुपये इतकी दंडात्मक वसुली करण्यात आली. विशेष म्हणजे याआधीही या दुकानावर प्लास्टिक जप्ती कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही दुकान मालक विनोद माळी यांच्या माध्यमातून प्रतिबंधित प्लास्टिकची खुलेआम विक्री सुरू होती, अशी माहिती सहाय्यक आयुक्त सुकदेव दरवेशी यांनी दिली. महापालिकेने एकल प्लास्टिकविरोधातील मोहीम तीव्र केल्यानंतर, सुकदेव दरवेशी यांच्या नेतृत्वात करण्यात आलेली ही सलग चौथी कारवाई आहे. या कारवाईंतही पालिकेने लाखो रुपयांचे प्लास्टिक जप्त केलेले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -