घरपालघरशहरात सर्रास सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान सुरू

शहरात सर्रास सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान सुरू

Subscribe

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करताना आढळल्यास २०० रुपयांचा दंड असल्याचा विसर धूम्रपान करणार्‍यांना पडल्याचे चित्र शहरात दिसत आहे.

जव्हार शहर आणि परिसरामध्ये राजरोसपणे सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्याचे प्रकार सुरू आहेत. विशेष म्हणजे सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करताना आढळल्यास २०० रुपयांचा दंड असल्याचा विसर धूम्रपान करणार्‍यांना पडल्याचे चित्र शहरात दिसत आहे. धूम्रपान करत असलेल्या व्यक्तीला जेवढा शारीरिक धोका आहे, तेवढाच धोका हा त्याच्या आजूबाजूला असलेल्या लहान बालके, वृद्ध आणि इतर नागरिकांना होतो. परंतु शहरात या सगळ्या गोष्टींचा विसर पडत सर्रास सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर कोणत्याही दंड प्रक्रियेची भीती नाही, असे गृहीत धरून धूम्रपान होत आहे. प्रशासनाकडूनही धूम्रपान करणार्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास २०० रुपयांचा दंड आकारण्याची तरतूद आहे. दंड करण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांना आहेत. मात्र जव्हार शहरामध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभाग कार्यान्वित नसल्याने धूम्रपान करणार्‍यांना कसलीच भीती उरलेली नाही.

विडी, सिगारेट ओढल्याने फुफ्फुसाचे आजार जडतात. यासह कर्करोग, गळ्याचे आजार, तोंडाचे आजारही होतात. नागरिकांनी विडी, सिगारेट ओढू नये, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
– दानिश शेख, सामाजिक कार्यकर्ते

- Advertisement -

बस स्थानक परिसरात आगार प्रमुख आणि शाळा परिसरात मुख्याध्यापक तसेच महाविद्यालय परिसरात प्राचार्यांना हे अधिकार देण्यात आले आहेत. परंतु आजवर जव्हार येथील आगार प्रमुख यांच्याकडून दंड आकारणी करण्यात आलेली नाही. परिसरात हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी बहुतांश नागरिक येतात. तेव्हाच काहीजण धूम्रपानही करतात. यावेळी त्यांच्या बाजूला उभे असलेल्यांना तोंडाला रुमाल बांधावा लागतो.

एसटीमधून प्रवास करताना धूम्रपान करणार्‍याला अटकाव करण्यात येत आहे. एसटी आगार किंवा बस स्टँड परिसरात धूम्रपान करू नये, यासाठी वारंवार लाऊड स्पीकरमध्ये आवाहन करण्यात येते.
– राजेश दांडेकर, प्रभारी, एसटी आगार व्यवस्थापक, जव्हार

- Advertisement -

 

हेही वाचा –

UPSC 2021 Final Result : यंदाच्या युपीएससी परीक्षेत मुलींची बाजी; श्रुती शर्मा देशात पहिली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -