Eco friendly bappa Competition
घर पालघर ... म्हणून आम्ही आसिफला मारले

… म्हणून आम्ही आसिफला मारले

Subscribe

विशेष म्हणजे हे आरोपी बोईसर येथे बरेच वर्षांपासून वास्तव्यास असून परिसरातील परिस्थितीची चांगली जाणीव आहे, तसेच मराठी भाषा ही त्यांना नीट बोलता येत असल्याचे तपासात समोर आले आहे.

पालघर: पालघरमध्ये बदली ड्रायव्हर म्हणून आपला उदरनिर्वाह करणार्‍या आसिफ घाची याच्या हत्याप्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. तीन आरोपींपैकी दोघे जण ताब्यात आले असून धर्मानंद उमाकांत जाल(वय-२४), सेसवा उर्फ प्रीतम सांता मेहर(वय-२५) तर तिसरा मारेकरी खुशीराम राजू डोलामणी हा अद्याप फरार आहे. पकडण्यात आलेल्या मारेकर्‍यांची कसून चौकशी केली असता गाडी चोरी करून ओडिशा राज्यात भाडे तत्वावर चालवण्याची योजना असल्याचे त्यांनी कबूल केले आहे. तर गाडी चोरी केल्यानंतर कुठलाही पुरावा राहू नये, या उद्देशाने ड्रायव्हर आसिफ घाची याचा खून केला असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे हे आरोपी बोईसर येथे बरेच वर्षांपासून वास्तव्यास असून परिसरातील परिस्थितीची चांगली जाणीव आहे, तसेच मराठी भाषा ही त्यांना नीट बोलता येत असल्याचे तपासात समोर आले आहे.

१२ ऑगस्ट रोजी नाशिक येथून कुटुंबाला आणायचे आहे.त्यासाठी कार भाडे तत्वावर पाहिजे आहे,असे सांगून या ते बदली ड्रायव्हर आसिफला घेऊन गेले होते. मोखाडा येथील मोरचंडी घाटात ते आसिफचा खून करून पसार झाले होते. त्यानंतर पहिल्या मारेकर्‍याला ओडिशा येथून अर्टिगा कारसह ताब्यात घेण्यात आले. दुसर्‍या मारेकर्‍याला नागपूर रेल्वे स्थानकातून, तर तिसरा मारेकरी अद्याप फरार असून त्याला ही लवकर जेरबंद करण्यात येईल, असे पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले आहे. याबाबत पालघर पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला असता तांत्रिक गाडीसह तिन्ही मारेकरी ओडिशा येथील असल्याचे निष्पन्न झाले. मारेकर्‍याला पकडण्यासाठी तसेच चोरीला गेलेली गाडी हस्तगत करण्यासाठी पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याकडून सहा पथके ओडीसा राज्यात पाठविण्यात आली होती.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -