घर पालघर पैसा पॉवर अभावी सौर ऊर्जा प्रकल्प चालेनात

पैसा पॉवर अभावी सौर ऊर्जा प्रकल्प चालेनात

Subscribe

याचीच फलनिष्पत्ती म्हणजे तालुक्यात ही योजना केवळ सहा ठिकाणी कार्यरत आहे. त्यामुळे सौरऊर्जेला अल्प प्रतिसाद असल्याचे एकूणच चित्र आहे.

जव्हार: जव्हार तालुका हे थंड हवेचे ठिकाण असले तरी डोंगराळ भाग असल्याने उन्हाची तीव्रता ही असते. या भागात सौर ऊर्जेचा वापर केल्यास ग्राहकांच्या दृष्टीने किफायतशीर ठरणारे आहे. परंतु, आदिवासी आणि ग्रामीण भाग असल्याने रोजगाराच्या कमतरतेमुळे सौर ऊर्जा युनिट खरेदी करिता लागणारा खर्च हा सामान्यजनाला झेपणारा नाही. याचीच फलनिष्पत्ती म्हणजे तालुक्यात ही योजना केवळ सहा ठिकाणी कार्यरत आहे. त्यामुळे सौरऊर्जेला अल्प प्रतिसाद असल्याचे एकूणच चित्र आहे.

पर्यावरणपूरक व सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून सोलर रुफटॉप योजना सुरू केली आहे.यामध्ये किलोवॅटनुसार २० ते ४० टक्क्यांपर्यंत सवलत यात दिली जाते. सोलर रुफटॉप योजनेमुळे विजेची बचत होते. शिवाय ग्राहकांकडून महावितरण अतिरिक्त वीज खरेदी करते. त्यामुळे हा प्रकल्प ग्राहकांसाठी फायद्याचाच आहे. परंतु, छतावर सोलर पॅनल बसवायचे असल्यास साधारण घरगुती १०० ते ३०० युनिट वापरकर्त्यांना २ ते ३ किलोवॅटचा सोलर पॅनल बसवावा लागतो. हा खर्च दीड लाख रुपयांच्या घरात आहे. सोलर पॅनलचे आयुष्य २५ वर्षांचे आहे. त्यात पाच वर्षात हा खर्च भरून निघतो. मात्र, घरगुती ग्राहकांना हा खर्च परवडणारा नाही.

- Advertisement -

 

सोलर रुफटॉप ही पर्यावरणपूरक आणि शाश्वत ऊर्जा देणारी योजना आहे. ही योजना सर्वांच्या फायद्याची आहे.स्वतः विजेची निर्मिती करून येणारे मासिक वीज बिलात बचत करता येते तसेच ते शुन्यावर आणता येते. केंद्र व राज्य सरकारकडून याला प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांनी या योजनेचा आधार घेत सोलर रुफटॉप योजना राबविल्यास लाभदायक ठरेल.
– किरण जाधव ,उपकार्यकारी अभियंता ,महावितरण जव्हार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -