घरपालघरकांदळवन व जैव विविधता उद्यानासाठी जागा आरक्षित

कांदळवन व जैव विविधता उद्यानासाठी जागा आरक्षित

Subscribe

या आराखड्यात जैव विविधता उद्यानासाठी व कांदळवन कक्ष पर्यायी जागेचे आरक्षण टाकलेले नव्हते. हे आरक्षण नसल्यामुळे महापालिकेला विकासकामे करताना मोठी अडचण निर्माण होत होती. त्यामुळे हे आरक्षण टाकणे आवश्यक होते.

भाईंदर – मीरा -भाईंदर शहरात कांदळवन व जैव विविधता उद्यानासाठी जागा आरक्षित केलेली नव्हती. कांदळवन व जैव विविधता उद्यानासाठी जागा आरक्षित करणे आवश्यक होते. त्यासाठी महापालिकेने उत्तनमध्ये सर्वे क्र. ३५२ पै. मध्ये नऊ हेक्टर जागा कांदळवन कक्ष पर्यायी जागा व जैव विविधता उद्यानासाठी ३१ हेक्टर जागा आरक्षित केली आहे. जागा आरक्षित केल्यामुळे विकास आराखड्याच्या बदलाला शासनाकडून मान्यता मिळण्यासाठी राज्याच्या नगरविकास विभागाला प्रस्ताव सादर केला आहे. त्या प्रस्तावाला मान्यता मिळताच पुढील कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. भाईंदर पश्चिमेच्या मौजे डोंगरी, उत्तन , तारोडी, चौक, पाली या गावांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने विकास आराखडा तयार केला आहे. या आराखड्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महापालिकेला देण्यात आलेली आहे. या आराखड्यात जैव विविधता उद्यानासाठी व कांदळवन कक्ष पर्यायी जागेचे आरक्षण टाकलेले नव्हते. हे आरक्षण नसल्यामुळे महापालिकेला विकासकामे करताना मोठी अडचण निर्माण होत होती. त्यामुळे हे आरक्षण टाकणे आवश्यक होते.

सध्या सुभाषचंद्र बोस मैदानाचा विकास, भाईंदर उत्तन रस्ता, जेसल पार्क घोडबंदर रस्ता अशी अनेक विकासकामे प्रस्तावित आहेत. त्यासाठी काही ठिकाणी कांदळवन काढावे लागणार असल्याने महापालिकेला वनविभागाला पर्यायी जागा द्यावी लागणार आहे. त्यासाठी उत्तन येथील सुमारे ९९ हेक्टर सरकारी जागेपैकी ९ हेक्टर जागेवर कांदळवन कक्ष पर्यायी जागा हे आरक्षण महापालिकेकडून प्रस्तावित करण्यात आले. ही जागा सध्या हरित क्षेत्रात समाविष्ट असून ती महाराष्ट्र सरकारच्या मालकीची आहे. एमएमआरडीएच्या मंजूर विकास योजनेनुसार मौजे उत्तन येथील स.क्र.३५२ पै. ही जागा १२ मी. रुंद विकास योजना रस्ता, इतर रस्ता अन्वये बाधीत होत असून उर्वरीत जागा हरित क्षेत्रामध्ये समाविष्ट आहे. या जागेपैकी ३१ हेक्टर जागा ही जैव विविधता उद्यानासाठी व कांदळवन कक्ष पर्यायी जागा आरक्षित करणे आवश्यक आहे.

- Advertisement -

बॉक्स

काय आहे नियम?

- Advertisement -

विकासकामे करत असताना त्यामध्ये बाधित होणार्‍या कांदळवनाची पुन्हा लागवड करावी लागते. कांदळवनांची पुन्हा लागवड करण्यासाठी वनविभागाला पर्यायी जागा द्यावी लागते. जेवढी कांदळवने काढण्यात येतात, त्या बदल्यात प्रती रोप वनविभागाला पैसे द्यावे लागतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -