घरपालघरकृत्रिम तलावांना उत्स्फूर्त प्रतिसाद

कृत्रिम तलावांना उत्स्फूर्त प्रतिसाद

Subscribe

यासाठी शहरातील सर्व तलाव बंद करून विविध भागात ६२ कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. तलावालगतच कृत्रिम तलाव उभारले आहेत. त्याला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. गणपतीची मूर्ती आल्यानंतर भाविकांना आरती करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

वसईः प्रदूषण रोखण्यासाठी यंदा वसई विरार महापालिकेने ६२ कृत्रिम तलाव तयार केले आहेत. दीड दिवसांच्या गणपती विसर्जनाला कृत्रिम तलावांना चांगला प्रतिसाद मिळाला. कृत्रिम तलावांना विरोध न करता भाविकांनी भक्तीमय वातावरणात पारंपारिक तलावांऐवजी कृत्रिम तलावात गणेश विसर्जन करत महापालिकेच्या कृत्रिम तलावांना प्रतिसाद दिला.प्रदूषण रोखण्यासाठी यंदा महापालिकेने यंदा कृत्रिम तलावांचा अभिनव प्रयोग राबवला आहे. यासाठी शहरातील सर्व तलाव बंद करून विविध भागात ६२ कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. तलावालगतच कृत्रिम तलाव उभारले आहेत. त्याला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. गणपतीची मूर्ती आल्यानंतर भाविकांना आरती करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आरती केल्यानंतर या मूर्ती महापालिकेचे कर्मचारी ताब्यात घेऊन तलावात परंपरेनुसार फक्त बुडवून काढून कृत्रिम तलावात विधिवत विसर्जित करतात. त्यानंतर त्या मूर्ती पाण्यातून काढून शेजारी बांधलेल्या मंडपात ठेवण्यात येतात. या मूर्ती संकलित करून नंतर त्या शहराच्या बाहेर असलेल्या दगडखाणींच्या तलावात नेऊन विसर्जित करण्यात येतात. संपूर्ण शहरात एकूण ६२ ठिकाणी कृत्रिम तलाव बसवण्यात आले आहेत. याशिवाय २१ मूर्ती संकलन केंद्र व १८ फिरते हौद ठेवण्यात आले आहेत. यामुळे सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात कृत्रिम तलावांमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन करता येणार आहे. ज्यामुळे तलावातील नैसर्गिक झरे, जलचर प्राणी यांचा प्लॅस्टर ऑफ पॅरिस व रासायनिक रंगांमुळे होणार्‍या हानीस प्रतिबंध घालता येईल, हा त्यामागील हेतू आहे. यापुढचे विसर्जनही कृत्रिम तलावातच करण्यात येणार आहे.

- Advertisement -

बॉक्स

वसई विरार महापालिकेच्या हद्दीत दीड दिवसांच्या एकूण १२ हजार १४९ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यातील ८ हजार ५१५ गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले. दीड दिवसांच्या १४९ सार्वजनिक आणि १२ हजार घरगुती गणेशांचे विसर्जन करण्यात आले. यातील ८२ सार्वजनिक आणि ८ हजार ४३३ घरगुती गणेशांचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. दीड दिवसांच्या गणेशमूर्ती विसर्जनाप्रमाणेच यापुढे होणार्‍या मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांमध्येच जास्तीत जास्त मूर्ती विसर्जन करून प्रदुषण रोखण्याच्या कामात सहभागी होऊन पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -