घरपालघरएसटी बसची ऐन दिवाळीत दरवाढ

एसटी बसची ऐन दिवाळीत दरवाढ

Subscribe

परतीचा पाऊस, महागाई, धान खरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब या सगळ्या गोष्टी एकदाच झाल्याने जव्हारसारख्या ग्रामीण भागातील नागरिकांचे पार कंबरडे मोडले.

जव्हार : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने ३१ ऑक्टोबरपर्यंत तिकीट दरात हंगामी भाडेवाढ केली आहे. या निर्णयामुळे प्रवासादरम्यान 5 ते ३० रुपये अधिक मोजण्याची वेळ प्रवाशांवर आल्याने वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना ऐन दिवाळीतच एसटीचा प्रवास महागला आहे. जागतिक महामारी कोरोनाच्या दोन वर्षाच्या विश्रांतीनंतर राष्ट्रीय सण दिवाळी जव्हार तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा झाला. परंतु या दरम्यान महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटीने दरवाढ केल्याने प्रवाशांत नाराजीचा सूर उमटला. परतीचा पाऊस, महागाई, धान खरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब या सगळ्या गोष्टी एकदाच झाल्याने जव्हारसारख्या ग्रामीण भागातील नागरिकांचे पार कंबरडे मोडले.

एसटी महामंडळ पालघर विभागाच्या जव्हार आगार अखत्यारित ठाणे, पुणे, पंढरपूर, धुळे, नाशिक, डहाणू, पालघर, कल्याण आणि ग्रामीण भागातील खेडोपाडी एसटी धावते. सुखकर व आरामदायी प्रवासासाठी सध्या एसटी बसेससह निमआराम, बसेसची सुविधा तालुक्यात सुरु आहे. त्यातच पालघर ,डहाणू, बोईसर, ठाणे ,वाडा सेलवास ,चाळीसगाव,पारनेर या आगारातील बस सेवा सुरू असल्याने प्रवाशांच्या दृष्टीने सोयीचे झाले तरी एसटीच्या प्रवास तिकीट दरात वाढ झाल्याने अनेक कुटुंबांना ये-जा करण्यासाठी आर्थिक भार वाढल्याने दिवाळी सणात आर्थिक अडचण निर्माण झाली. तालुक्यात एसटीचा प्रवास सर्वसामान्यांना परवडण्यासारखा असल्याने मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करीत आहेत. मात्र ऐन दिवाळीत एसटीच्या तिकिटात दहा टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. ६० किलो मीटर मागे 5 रुपये अशा पद्धतीने ५ रुपयांपासून ३० रुपयांपर्यंत एसटी बसचे तिकीट वाढले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -