वाडा : एसटीचे तिकीटही कॅशलेस झाले आहे. बस प्रवासादरम्यान वाहक आणि प्रवाशांत कायम वाद होतो तो वाद सुट्या पैशावरून, प्रत्येकाला देण्यासाठी सुटे पैसे कुठून आणायचे; असा त्यागा वाहक करताना दिसतो, तर आमच्याकडे सुट्टे पैसे नाहीत, आम्ही तरी कुठून देणार असा प्रवाशांचा रास्त सवाल असतो. सर्रास असे वाद पाहायला मिळतात. यावर तोडगा काढतानाच राज्यमार्ग परिवहन मंडळाने आता कॅशलेस व्यवहाराची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ईबीस्कॅश कंपनीशी महामंडळाने करार केला आहे. 11 डिसेंबर रोजी परिवहन महामंडळाचा एसटीचा प्रवास कॅशलेस करण्यात आल्याचा आदेश जारी केला. त्यानुसार महाराष्ट्रात आता एसटी प्रवास कॅशलेस झाला आहे. एसटीमधील 34 हजार वाहकांच्या हाती नव्हे अँड्रॉइड बेस तिकीट इशू मशीन देण्यात आले आहे.
कॅशलेस व्यवहार तुलनेने कमी जोखमीचा आहे. प्रवासी आणि वाहक दोघांनाही पैसे सांभाळण्याची जोखीम राहत नाही. या यंत्राच्या वापराचे प्रशिक्षण वाहकांना दिले जाणार आहे. राज्यातील बहुतांश आगारांमध्ये अंशतः या तिकीट इश्यू मशीन चे वाटप करण्यात आले आहे. वाडा आगारात हे मशीन प्रत्येक वाहकाच्या हाथी दिले आहे.
– समीर केबुलकर, आगार व्यवस्थापक ,वाडा
एसटीचा प्रवास होणार कॅशलेस
written By My Mahanagar Team
wada