घरपालघरजेट्टीवरून भाईंदर ते वसई रो-रो सेवा सुरू करा

जेट्टीवरून भाईंदर ते वसई रो-रो सेवा सुरू करा

Subscribe

खासदार राजन विचारे यांनी संसदेत मुद्दा उपस्थित करून संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा केली होती.

भाईंदर :-खासदार राजन विचारे यांनी महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक गुरसळ यांना पत्राद्वारे मीरा-भाईंदर वासीयांना भाईंदर ते वसई या तयार झालेल्या जेट्टीवरून तात्काळ रो-रो सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे. खासदार राजन विचारे यांच्याकडून भाईंदर ते वसई जलवाहतूक सेवा सुरू करावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे सन २०१६ ला केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेअंतर्गत मंजुरी मिळाली. परंतु पर्यावरणाच्या व पुरातत्त्व विभागाच्या परवानग्या न मिळाल्याने या कामास सुरुवात करण्यास विलंब लागत होता. खासदार राजन विचारे यांनी संसदेत मुद्दा उपस्थित करून संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा केली होती.

सर्वप्रथम भाईंदर पश्चिमेकडील जेट्टीचे काम पूर्ण झाले. त्यानंतर रखडलेल्या वसई जेट्टीचेही काम पूर्ण करून झाले. या दोन्ही जेट्टीची कामे पूर्ण झाल्याची खात्री करून घेण्यासाठी खासदार राजन विचारे यांनी भाईंदर आणि वसई या दोन्ही जेट्टीची पाहणी महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिकार्‍यांच्या समवेत केली. यावेळी त्यांनी या दोन्ही जेट्टींची कामे पूर्ण झाली आहेत. यासाठी वाहनांची अधिक क्षमता असणारी बोट उपलब्ध करून घ्यावी. जेणेकरून नागरिकांना दीड तासाचा वाहतूक कोंडीचा प्रवास करावा लागत होता तो या रो -रो जलमार्गे केल्याने दहा मिनिटांचा होणार आहे. हा सुखकर मार्ग लवकर सुरु करावा, अशी मागणी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -