Eco friendly bappa Competition
घर पालघर आरटीओ कॅम्पचे स्टेअरिंग दलालांच्या हाती

आरटीओ कॅम्पचे स्टेअरिंग दलालांच्या हाती

Subscribe

ज्याचे पैसे आले त्यांच्या फॉर्मवर विशिष्ट पद्धतीने खूण दलालांमार्फत करून मगच फॉर्म परिवहन निरीक्षकाकडे दिले जातात. यात दलालांव्यतिरिक्त ऑनलाईन फॉर्म भरून येणार्‍या नागरिकांची गैरसोय होत असते.

पालघरः जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या पालघर शहरात आरटीओचे कार्यालय आणि पासिंग ट्रॅक नाही. त्यामुळे नागरिकांची विरार येथील आरटीओ कार्यालयात लायसन्स आणि गाडी पासिंगसाठी जाण्यासाठी मोठी गैरसोय होत असते. त्यामुळे पालघर शहरातील जुन्या सातपाटी रोडवरील मैदानात दर आठवड्याच्या शुक्रवारी आरटीओ कॅम्प लावण्यात येत आहे. या कॅम्पसाठी वसई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून येणारे अधिकारी आणि कर्मचारी हे कमी असल्याने या कॅम्पला दलालांनी आपल्या फायद्यासाठी उपयोगात आणल्याचे समोर आले आहे. सामान्य नागरिकांना प्रशासनाने दलाली द्यावी लागू नये, म्हणून मोबाईल ऍप आणि वेबसाईट सुरु केली असली तरीही गाडी पासिंग आणि लायसन्स टेस्टसाठी कार्यालयात किंवा कॅम्पच्या ठिकाणी जावे लागते. या कॅम्पच्या ठिकाणी सकाळी नऊ वाजल्यापासून दलाल आपले टेबल टाकून बसतात. आपणच परिवहन निरीक्षक असल्याच्या तोर्‍यात मिरवत असतात. ड्रायविंग लायसन्स टेस्टच्या वेळी उमेदवाराचे फॉर्म याच दलालांच्या हातात असतात. हेच दलाल वसुली एजंटचे काम सुद्धा पाहतात. ज्याचे पैसे आले त्यांच्या फॉर्मवर विशिष्ट पद्धतीने खूण दलालांमार्फत करून मगच फॉर्म परिवहन निरीक्षकाकडे दिले जातात. यात दलालांव्यतिरिक्त ऑनलाईन फॉर्म भरून येणार्‍या नागरिकांची गैरसोय होत असते.

 

- Advertisement -

सामान्य नागरिकांना चुकीची माहिती

दलाल सकाळी आरटीओ कॅम्पमध्ये येणार्‍या सामान्य नागरिकांना चुकीची माहिती देऊन आणि अधिकार्‍यांनी पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही असे सांगून पैसे वसूल करतात. त्यामुळे दलालांना या आरटीओ कॅम्पमध्ये येण्यास प्रशासनाने मज्जाव केला पाहिजे, अशी मागणी केली जाते. याप्रकरणी परिवहन विभागाची प्रतिक्रिया घेण्यासाठी वसई विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांना संपर्क केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -