घरपालघरपरिवहन विभागाचे स्टेअरिंग प्रशासनाच्या हाती

परिवहन विभागाचे स्टेअरिंग प्रशासनाच्या हाती

Subscribe

३१ जानेवारीला सर्वच सदस्यांचा कार्यकाल संपुष्टात आल्याने १ फेब्रुवारीपासून कारभार प्रशासनाच्या हाती गेला आहे.

वसईः वसई -विरार महापालिकेच्या परिवहन समितीमधील सर्वच सदस्यांचा कार्यकाल संपुष्टात आल्याने आता कारभार प्रशासनाच्या हाती गेला आहे. शेवटच्या सभापतींना अवघ्या चाळीस दिवसांचाच कालावधी मिळाला. वसई -विरार महापालिकेची स्थापना झाल्यानंतर ३ ऑक्टोबर २०१२ रोजी महापालिकेची परिवहन सेवा सुरु केली होती. आतापर्यंत परिवहन समितीचा कारभार सदस्यांच्या हाती होता. ३१ जानेवारीला सर्वच सदस्यांचा कार्यकाल संपुष्टात आल्याने १ फेब्रुवारीपासून कारभार प्रशासनाच्या हाती गेला आहे.

वसई -विरार महापालिकेच्या परिवहन समितीवर बारा सदस्य होते. गेली तीन वर्षे निवडणूक होऊ न शकल्याने कार्यकाल संपलेल्या सदस्यांच्या जागा भरल्या गेल्या नाहीत. त्यामुळे टप्याटप्याने सदस्यांचा कार्यकाल ३१ जानेवारीला उर्वरित सहा सदस्यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने एकही सदस्य उरला नाही. त्यामुळे १ फेब्रुवारीपासून परिवहन समितीचा कार्यभार प्रशासनाच्या हाती गेला आहे. महापालिकेची परिवहन सेवा खरेदी करा, ऑपरेट करा आणि देखभाल करा या पध्दतीवर खासगी ठेकेदार चालवत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -