घरपालघरखडकोना गावात घातक रासायनिक घनकचऱ्याचा साठा

खडकोना गावात घातक रासायनिक घनकचऱ्याचा साठा

Subscribe

पालघर-बोईसरमधील औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणकारी कारखान्यांमधील घातक रासायनिक घनकचऱ्याची बेकायेशीररित्या विल्हेवाट लवणारे भंगार माफिया दुर्गम ग्रामीण भागात सक्रीय झाले आहेत.

पालघर-बोईसरमधील औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणकारी कारखान्यांमधील घातक रासायनिक घनकचऱ्याची बेकायेशीररित्या विल्हेवाट लवणारे भंगार माफिया दुर्गम ग्रामीण भागात सक्रीय झाले आहेत. बेकायेशीररित्या विल्हेवाटीसाठी आणलेला साठा मुंबई-अहमदाबाद महामार्गालगतच्या वाडा- खडकोना ग्रामपंचायत हद्दीत खडकोना गावात एका गोदामात आढळून आला आहे. खड्डा खोदून घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आल्याने लगतचे नैसर्गिक स्रोत दूषित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रासायनिक घनकचऱ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आल्याने भंगार माफियांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

खडकोना गावातील रासायनिक घनकचरा साठवलेल्या गोदामाच्या खालच्या बाजूस नैसर्गिक नाला आहे. नाल्याच्या पाण्याचा पिण्यासाठी उपयोग केला जात असल्याने जलप्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे. तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणकारी कारखान्यांमधील रासायनिक घनकचऱ्याची बेकायदेशीरपणे विल्हेवाट लावणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत. महामार्गालगत घनकचऱ्याची विल्हेवाट लावली जात असताना केमिकल माफिया ग्रामीण भागात पोहोचल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाडा खडकोना ग्रामपंचायत हद्दीतील खडकोना गावाच्या वेशीवर सर्व्हे क्रमांक १/६ सर्व्हे नंबरच्या शेतजमिनीवर पत्र्याचे कुंपण घालून गोदाम तयार करण्यात आले आहे. गोदामात घातक रासायनिक घनकचऱ्यानी भरलेले लोखंडी आणि प्लास्टिक सुमारे ९३ ड्रमची साठवणूक करण्यात आली आहे. याचठिकाणी तारापूर औद्योगिक वसाहतीतील डीआरकोट इंक अँड रेजिन्स प्रा. ली. या कारखान्याचा शिक्का असलेल्या रिकाम्या गोणी आढळून आल्या आहेत.

- Advertisement -

क्षेत्र अधिकाऱ्यांकडून गोदामस्थळी भेट देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याठिकाणी साठा केलेल्या घनकचऱ्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत. त्याच्या अहवालानंतर काही गैरप्रकार अडथळ्यासह संबंधितांवर कायदेशिर कारवाई केली जाईल.
– प्रशांत गायकवाड, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ

खडकोनासारख्या आदिवासीबहुल ग्रामीण भागात घातक रासायनिक घनकचरा साठवणूक आणि विल्हेवाटीमुळे पाण्याचे नैसर्गिक स्रोत दूषित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रासायनिक घनकचऱ्याच्या दुष्परिणामाबाबत अनभिज्ञ असलेल्या आदिवासी ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण केला जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या केमिकल माफियांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार खडकोना गावातील सर्व्हे क्रमांक १/६ ही शेतजमीन बोईसर भागातील भंगार व्यावसायिकाला विक्री करण्यात आली आहे. या शेतजमिनीवर चांद इंटरप्राजेसचे मालक महमद चांद यांनी कुंपण घालून गोदाम तयार केले आहे. महंमद चांद यांनी हे गोदाम जावेद नामक भंगार व्यवसायिकाला भाड्याने दिले होते.

- Advertisement -

बोईसरमधील भंगार माफिया तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणकारी कारखान्यांमधील घातक घनकचऱ्याची बेकायदेशीर साठवणूक आणि विल्हेवाट करण्याच्या कामात अग्रेसर असल्याची माहिती पुढे येत आहे. साठवणूक केलेल्या घनकचऱ्याची नदी, नाले आणि महामार्गालगत निर्जनस्थळी विल्हेवाट लावली जाते. प्रदूषणकारी कारखाने याकामी भंगार माफियांना निधी उपलब्ध करून देत असल्याची माहिती पुढे येत आहे. मनोर पोलिसांकडून गोदामाची पाहणी करण्यात आली आहे. गोदाम मालकाकडून घनकचऱ्याबाबत माहिती मिळवण्याचे काम पोलिसांकडून सुरू करण्यात आले आहे.

हेही वाचा –

Omicron Variant: देशात ओमिक्रॉनबाधितांची संख्या २००वर; ७७ रुग्ण झाले बरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -