घरपालघरदेवळात चोरी केली, देवीला नमस्कार,सीसीटीव्हीला बायबाय

देवळात चोरी केली, देवीला नमस्कार,सीसीटीव्हीला बायबाय

Subscribe

सीसीटीव्ही कॅमेर्‍याला बायबाय करत या चोरट्याने धूम ठोकली. या प्रकरणात पालघर पोलीस ठाण्यात कलम 380, 457 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सध्या पालघर पोलीस करत आहे.

नदीम शेख,पालघर : आपल्या देशात देवळात चोरी होण्याचे प्रकार नवीन नाहीत.परंतु,कधी कधी चोर देखील असा कारनामा करतात की असे वागतात की चोरीची घटना बाजूला बघणार्‍यांना चोराचंच हसू येत. पालघरमधील दापोली येथील रेणुका माता मंदिरात अशी काहीशी घटना घडली आहे. चोरट्याने दान पेटी आणि देवीच्या चांदीच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे मध्य रात्री चोरट्याने केलेला हा कारनामा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. चोरी केल्यानंतर चोरट्याने देवीचे दर्शन घेतले तसेच सीसीटीव्ही कॅमेर्‍याला बायबाय करत या चोरट्याने धूम ठोकली. या प्रकरणात पालघर पोलीस ठाण्यात कलम 380, 457 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सध्या पालघर पोलीस करत आहे.

पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावरील दापोली गावच्या रेणुका मातेच्या मंदिराच्या दानपेटीतील रोख रक्कम आणि देवीच्या गळ्यातील चांदीचा हार असा सुमारे ८९ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. पालघर तालुक्यातील जिल्हा संकुलाच्या रस्त्यावरील दापोली येथे काही महिन्यांपूर्वीच दापोली वासीयांकडून रेणुका मातेच्या भव्य मंदिराची उभारणी करण्यात आली होती. या मंदिराच्या जीर्णोद्धारावेळी अनेक भक्तांनी चांदीच्या आभूषणांसह नाना अलंकार, रोख रक्कम देवीला अर्पण केली होती. देवळात दोन दानपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. ८ जानेवारी रोजी मंदिराचे पुजारी अनुज झा हे पूजा करून झोपी गेले. त्यानंतर, मध्यरात्री देवळाच्या मुख्य दरवाजाचे कडीकोयंडे तोडून देवीच्या अंगावरील चांदीचा हार आणि दोन दानपेट्यांतील रोख रक्कम असा सुमारे ८९ हजारांचा ऐवज चोरट्याने चोरून गेल्याची माहिती त्यांनी सरपंच हेमंत संखे यांना दिली. त्यांनी पालघर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सीसीटीव्हीमध्ये दिसलेल्या अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पालघर पोलीस करत आहेत. चोरट्याचा तपास करून त्याला तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

- Advertisement -

बॉक्स

विशेष म्हणजे चोरट्याने भर थंडीत देखील अंगावर एक चड्डी आणि तोंडावर मास्क याशिवाय काहीही परिधान केलेले नव्हते. असे करताना कपड्यांवरून ओळख पटणार नाही याची पुरेपूर काळजी त्याने घेतली होती.चोरी करून जाताना देवीला नमस्कार आणि सीसीटीव्हीला बायबाय करणार्‍या या चोरट्याला शोधणे पोलिसांसाठी नक्कीच आव्हानात्मक असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -