घरपालघरबेकायदा सुरुंगस्फोटांमुळे दगडाचे तुकडे ग्रामस्थांचा दारात

बेकायदा सुरुंगस्फोटांमुळे दगडाचे तुकडे ग्रामस्थांचा दारात

Subscribe

दगड खाणीतील स्फोटांमुळे जिवीत हानीची शक्यता असल्याने दगड उत्खनन बंद करण्याची मागणी जोर धरत आहे.

मनोर: खाणीतील दगड उत्खननासाठी केलेल्या स्फोटामुळे उडणारे दगडाचे तुकडे नागरी वस्तीत येत असल्याने दहीसर तर्फे मनोर गावच्या देवणी पाड्याचे ग्रामस्थ भीतीच्या छायेत वावरत आहेत.मंगळवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास केलेल्या सुरुंग स्फोटांमुळे उडालेले दगडाचे तुकडे ग्रामस्थांच्या अंगणात आल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.दगड खाणीतून दगडाच्या उत्खननासाठी सुरुंग स्फोट घडवून आणण्यासाठी महसूल विभागा कडून परवानगी घेतली नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

दोन महिन्यांपूर्वी दगड खाणीत केलेल्या स्फोटा दरम्यान उडालेला दगड खाणी लगतच्या राहत्या घरात पडून घराच्या छताचे नुकसान झाले आहे. नशीब बलवत्तर म्हणून स्वयंपाक गृहात स्वयंपाक तयार करणारी गृहिणी थोडक्यात बचावली होती.सहा वर्षांपूर्वी सुरुंग स्फोटातून दगड उडाल्याने खाणी लगतच्या शाळेच्या छताचे नुकसान झाले होते.बंद असलेल्या वर्गाच्या छतावर दगड पडल्याने लगतच्या वर्गातील विद्यार्थी बचावले होते. दगड खाणीतून सुरू असलेले बेकायदेशीर सुरुंग स्फोट बंद करण्याच्या मागणीकडे महसूल विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.सुरुंग स्फोटांमुळे डेवणी पाड्यातील ग्रामस्थ भीतीच्या छायेत असल्याने बेकायदेशीर सुरुंग स्फोट करणार्‍यांविरोधात कारवाईची मागणी जोर धरत आहे. दगड खाणीतील सुरुंग स्फोटांविरोधात महसूल विभागाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही महसूल विभागाकडून कारवाई केली जात नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दगड खाणीतील स्फोटांमुळे जिवीत हानीची शक्यता असल्याने दगड उत्खनन बंद करण्याची मागणी जोर धरत आहे.

- Advertisement -

 

प्रतिक्रिया

- Advertisement -

घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्याच्या सूचना संबंधित तलाठ्यांना देण्यात आल्या आहेत. पंचनामा प्राप्त झाल्यानंतर अहवाल तहसीलदार कार्यालयात पाठवला जाईल.

– ज्योती वरहे,मंडळ अधिकारी, दहिसर तर्फे मनोर.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -