घरपालघरकोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांची आर्थिक लुटमार थांबवा; मनसेची मागणी

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांची आर्थिक लुटमार थांबवा; मनसेची मागणी

Subscribe

कोकणवासियांच्या भावनिक अडचणीचा गैरफायदा घेऊन खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या गरीब कोकणवासी चाकरमान्यांची प्रचंड प्रमाणात आर्थिक लुटमार करत आहेत.

कोकणवासियांच्या भावनिक अडचणीचा गैरफायदा घेऊन खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या गरीब कोकणवासी चाकरमान्यांची प्रचंड प्रमाणात आर्थिक लुटमार करत आहेत. विशेषत: खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांचे मालक आणि परिवहन विभागाचे काही संबंधित अधिकारी यांच्या संगनमताने ही लूट सुरु असल्याने ट्रॅव्हल्सचे दर निश्चित करून लुटमार थांबवावी, अशी मागणी मनसेचे महेश कदम यांनी केली आहे. गेल्या काही वर्षांपासून सतत गणेशोत्सवापासून ते थेट दसरा, दिवाळी, शिमग्यापर्यंतच्या सणासुदीच्या काळात कोकणवासियांची आर्थिक लुटमार होत आलेली आहे, अशी तक्रार कदम यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विरार भेटून केली आहे.

वसई, विरार ते डहाणूपर्यंतच्या उपनगरातील कोकणातील रहिवासी गणेशोत्सवाच्या काळात विरार याठिकाणाहून कोकणात जाणार्याो खासगी ट्रॅव्हल्स बसने प्रवास करतात. एसटीचा गोंधळाचा कारभार आणि वाहतूक व्यवस्थेची नसलेली व्यवस्था त्यामुळे एसटीने जाणे कोकणवासीयांना शक्य होत नाही. त्याचवेळी रेल्वेनेही जाणे शक्य होत नाही. अशावेळी कोकणातील चाकरमानी गणेशोत्सवासाठी विरार येथून सुटणार्याा खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या बसने कोकणात ये-जा करण्याचा मार्ग निवडतात. कोकणवासीयांच्या भावनिक अडचणीचा मोठ्या प्रमाणात गैरफायदा घेऊन खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या गरीब कोकणवासी चाकरमान्यांची प्रचंड प्रमाणात आर्थिक लुटमार करतात. विशेषत: खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांचे मालक आणि परिवहन विभागाचे काही संबंधित अधिकारी यांचे यांच्या संगनमताने यापूर्वी गणेशोत्सवापासून ते थेट दसरा, दिवाळी, शिमग्यापर्यंतच्या सणासुदीच्या काळात कोकणवासीयांची आर्थिक लुटमार होत आलेली आहे, अशी कदम यांची तक्रार आहे.

- Advertisement -

प्रत्येक वर्षी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विरार या कार्यालयातील संबंधित सक्षम अधिकारी गणेशोत्सव सुरू होण्याच्या काही दिवसआधी परिवहन विभागाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी) ला निश्चिअत करून दिलेले दर आणि खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांसाठी निश्चि त करून दिलेले दर जाहीर करतात. परंतु त्याआधीच खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी कोकणवासीयांकडून भरमसाट दराने आगाऊ तिकीट वसुली केलेली असते. म्हणजेच कोकणवासीयांची आर्थिक लुटमार झाल्यानंतर परिवहन विभाग जागा होतो. केवळ औपचारिकता म्हणून खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांचे दर परिवहन विभाग जाहीर करते. खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी कोकणात गणेशोत्सवासाठी जाणार्याख प्रवाशांकडून जे प्रतिप्रवासी दर आकारायचे आहेत ते जाहीर करावे आणि त्याप्रमाणे अंमलबजावणी करून घ्यावी, अशी कदम यांची मागणी आहे. केवळ आश्वारसन घेऊन न थांबता प्रत्यक्ष कारवाई होऊन कोकणवासीयांची लुटमार थांबत नाही तोपर्यंत याबाबत पाठपुरावाही सुरू राहील. गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलनही करण्यात येईल, असा इशाराही कदम यांनी दिला आहे.

हेही वाचा –

पश्चिम उपनगरासह शहर व पूर्व उपनगरातील काही भागात १०% पाणीकपात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -