घरपालघरकोकणवासीयांकडून जादा दर आकारल्यास होणार कडक कारवाई

कोकणवासीयांकडून जादा दर आकारल्यास होणार कडक कारवाई

Subscribe

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांकडून जादा दर आकारल्यास कडक कारवाई करणार असल्याचा इशारा विरार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डी. जी. वाघुले यांनी खासगी ट्रॅव्हल्स मालक व एजंट यांना दिला आहे.

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांकडून जादा दर आकारल्यास कडक कारवाई करणार असल्याचा इशारा विरार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डी. जी. वाघुले यांनी खासगी ट्रॅव्हल्स मालक व एजंट यांना दिला आहे. विरार पूर्व-मनवेल पाडा येथून अनेक खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या गणेशोत्सव आणि अन्य सणांना बसगाड्या सोडतात. मात्र या काळात खासगी ट्रॅव्हल्सकडून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची बेसुमार लूट केली जाते. त्यामुळे विरार परिवहन विभागाने या ट्रॅव्हल्सचे निश्चित दरपत्रक जाहीर करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महेश कदम यांनी केली होती. त्याकरता त्यांनी विरार परिवहन कार्यालयासमोर गणेश मूर्ती घेऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र या मुदतीत परिवहन विभागाने दरपत्रक निश्चित न केल्याने कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलन केले.

या आंदोलनाची दखल विरार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डी. जी. वाघुले यांनी घेतली. महाराष्ट्र राज्य परिवहनचे जितके भाडे असेल त्याच्या दीडपट भाडेच खासगी ट्रॅव्हल्सनी घेणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा जास्त भाडे घेतल्यास या ट्रॅव्हल्सवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा वाघुले यांनी दिला आहे. आंदोलनानंतर परिवहन विभागाकडून ट्रॅव्हल्स मालक आणि एजंट यांना समज देण्यात आलेली आहे. मात्र प्रवाशांनीदेखील यापेक्षा जास्त भाडे देऊ नये, अशा सूचना वाघुले यांनी केल्या आहेत. या काळात खासगी ट्रॅव्हल्सची तपासणी करण्याचे कामही करण्यात येत असल्याची माहिती वाघुले यांनी दिली.

- Advertisement -

दरम्यान, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डी. जी. वाघुले यांनी आंदोलकांसोबत चर्चा केली असली तरी उपप्रादेशिक परिवहन विभागाने दोन दिवसांत याबाबतचे निश्चित दरपत्रक संबंधित ठिकाणी लावून प्रवाशांना त्याची माहिती द्यावी. अन्यथा परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरासमोर ‘आरती आंदोलन’ करणार असल्याचा इशारा कदम यांनी दिला आहे.

परिवहनाचे वरातीमागून घोडे

गणेशोत्सवापासून प्रत्येक सणासुदीसह हिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीत कोकणासह इतर ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी उसळत असते. त्यावेळी ट्रॅव्हल्स कंपन्या आणि एजंट जादा दराने तिकीट विक्री करून प्रवाशांची लुटमार करीत असतात. त्यावर दरवर्षी कुणी ना कुणी आवाज उठवत असतो. त्यानंतर परिवहन विभाग जागे होऊन नेमक्या आयत्यावेळी जादा भाडे आकारू नये, असा वरकरणी आदेश देऊन आपली जबाबदारी झटकत असतात. महत्वाची बाब म्हणजे गणेशोत्सव आणि मे महिन्याच्या सुट्टीसाठी आगाऊ तिकीट विक्री केली जाते. आयत्यावेळी तिकीट फूल होऊन गैरसोय होऊ नये, यासाठी प्रवाशी दोन-तीन महिने आधीच बुकींग करत असतात. ट्रॅव्हल्स कंपन्या आणि एजंट तेव्हाच जादा तिकीट दर आकारत असतात. त्यामुळे परिवहनने आयत्यावेळी कारवाईचे सोंग घेण्याऐवजी ट्रॅव्हल्स कंपन्या आणि एजंटवर नियमीतपणे कारवाया केल्यास दरवाढीचा फटका बसणार नाही, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, परिवहन आणि ट्रॅव्हल्स कंपन्या, एजंटचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले असल्यानेच कारवाई करण्याकडे परिवहन कानाडोळा करत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

ISI चे ५० तालिबानी दहशतवादी कश्मीरमध्ये, गु्प्तचर यंत्रणाकडून अलर्ट जारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -