Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर पालघर पुनः प्रमाणीकरणच्या मुदतवाढीसाठी रिक्षांचा संप

पुनः प्रमाणीकरणच्या मुदतवाढीसाठी रिक्षांचा संप

Subscribe

असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या २६ सप्टेंबर २०२२ रोजीच्या बैठकीत ऑटोरिक्षा व टॅक्सी यांच्या भाडे दर वाढीस मान्यता देण्यात आली होती.

पालघर :  रिक्षा, टॅक्सी भाडे मीटर पुनः प्रमाणीकरण करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, प्रमाणीकरण न केल्यास प्रतिदिन प्रत्येकी आकारण्यात येणारा पन्नास रुपयांचा दंड रद्द करावा, या मागणीसाठी पालघर जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या प्रवासी रिक्षा, टॅक्सीचालकांनी बुधवारी बंदची हाक दिली. वसई -विरार शहरात परिचलन पद्धतीने टॅक्सी-ऑटोरिक्षा मीटर पुनः प्रमाणीकरण करण्याकरता मुदतवाढ देण्यात यावी, या मागणीसाठी शहरातील नवनिर्माण रिक्षा, टॅक्सी, टेम्पो चालक मालक संघटनेच्यावतीने विरार येथील आरटीओ कार्यालयावर चड्डी बनियान आंदोलन करण्यात आले. येत्या आठ दिवसात निर्णय न घेतल्यास रिक्षा बंद ठेऊन मंत्रालयावर धडक मोर्चा नेण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या २६ सप्टेंबर २०२२ रोजीच्या बैठकीत ऑटोरिक्षा व टॅक्सी यांच्या भाडे दर वाढीस मान्यता देण्यात आली होती.
सदर भाडेवाढ १ ऑक्टोबर २०२२ पासून लागू करण्याचे निर्देश मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने दिले होते. त्याअनुषंगाने भाडेवाढीचे भाडे मीटर पुनः प्रमाणीकरण करण्याकरता ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु ती मुदत अल्प दिवसांची होती. त्यामुळे अनेक संघटनांच्या मागणीनंतर १ डिसेंबर २०२२ ते १५ जानेवारी २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर आरटीओने दंडात्मक कारवाई सुरु केल्याने रिक्षाचालकांवर आर्थिक भुर्दंड पडू लागला आहे. म्हणूनच पुनः प्रमाणीकरण करण्याची मुदत येत्या ३१ मार्चपर्यंत वाढवण्याची मागणी करण्यात आली. हा शासन निर्णय असल्याने याप्रकरणी सरकारला अहवाल पाठवू असे आश्वासन मोर्चेकर्‍यांना आरटीओ अधिकार्‍यांनी दिले. येत्या आठ दिवसात मुदतवाढीचा निर्णय न झाल्यास रिक्षा बंद ठेऊन मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष महेश कदम यांनी दिला आहे.

प्रवाशांचे अतोनात हाल
मनोरमधील प्रगती रिक्षा चालक मालक संघाचे साडे तीनशे आणि स्वराज्य रिक्षा चालक मालक संघाच्या 60 रिक्षा चालकांनी एक दिवसाचा लाक्षणिक बंदमध्ये सहभाग घेत नोंदवत प्रवाशी वाहतूक बंद ठेवली होती.मनोर परिसरातील सर्वच रिक्षा बंद असल्याने विद्यार्थी आणि प्रवाशांचे अतोनात हाल झाले.प्रवास करण्यासाठी एसटीचा आधार घ्यावा लागला. तर काहींनी पायी प्रवास केला.मनोर बस स्टॉप, मस्तान नाका,टेन नाका,हालोली,वाडा खडकोना येथे प्रवाशांची गर्दी झाली होती. पालघरपासून विरार पर्यंतचे 60 किलोमीटर लांब जावे लागत असल्याने रिक्षा चालकांना आर्थिक भुर्दंड बसत असून आणि गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. पालघर तालुक्यातील उमरोळी गावच्या हद्दीत मंजूर असलेले परिवहन विभागाचे कार्यालयात सुरू न झाल्याने रिक्षा आणि टॅक्सी चालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे सांगत रिक्षा चालकांच्या गैरसोयीकडे लक्ष वेधण्यासाठी बंद पुकारल्याची माहिती प्रगती रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष साजिद खतीब यांच्या वतीने देण्यात आली.

- Advertisement -

सफाळ्यात रिक्षा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

या बंद दरम्यान सफाळे परिसरातील पूर्व, पश्चिम भागातील सर्व रिक्षा चालक मालक संघटनांनी बंदमध्ये सहभागी होत दिवसभर रिक्षा वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली होती. या दरम्यान नागरिकांचे हाल झाले. परिणामी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास काही प्रमाणात रिक्षा वाहतूक सुरू करण्यात आली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -