Eco friendly bappa Competition
घर पालघर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास तीव्र विरोध

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास तीव्र विरोध

Subscribe

संपूर्ण ओबीसी समाज संघटित होऊन मोर्चा, रास्ता रोको, साखळी उपोषण, जेलभरो अशा प्रकारची आंदोलने करण्याचा इशारा ठाणे, पालघर जिल्ह्यातील ओबीसी समाजातील प्रमुख नेत्यांकडून दिला जात आहे.

वाडा: मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, मात्र मराठ्यांना कुणबी अर्थात ओबीसी समाजातील कोट्यातून आरक्षण देण्यास यापुर्वीही विरोध होता, आताही आहे व यापुढेही राहील अशी भुमिका राज्यभरातील ओबीसींनी घेतली असून राज्यात ठिकठिकाणी ओबींसीची आंदोलने सुरु झाली आहेत. ठाणे, पालघर जिल्ह्यात मोठ्या संख्येने ओबीसी समाज असून या दोन्ही जिल्ह्यांत विविध ठिकाणी आंदोलने करण्यारी तयारी सुरु झाली असून पालघर जिल्ह्यातील पहिले आंदोलन उद्या गुरुवार (१४ सप्टेंबर) वाडा येथे होत आहे.मराठा समाजाला कुणबी या नावाने प्रमाणपत्र देऊन कुणबी समाज्याच्या आरक्षणातील वाटा दिल्यास कुणबीच नव्हे तर संपूर्ण ओबीसी समाज संघटित होऊन मोर्चा, रास्ता रोको, साखळी उपोषण, जेलभरो अशा प्रकारची आंदोलने करण्याचा इशारा ठाणे, पालघर जिल्ह्यातील ओबीसी समाजातील प्रमुख नेत्यांकडून दिला जात आहे.

राज्य सरकारने कुणबी समाजाला गृहीत धरून तातडीने कुठलाही निर्णय घेऊ नये, तसे केल्यास त्याचे तीव्र पडसाद उमटतील असे महाराष्ट्र राज्य कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. हा मोर्चा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस आगारापासून सकाळी 10 : 30 वाजता सुरु होऊन खंडेश्वरी नाका ते तहसीलदार कार्यालय येथे येऊन जाहीर सभा होणार असल्याची माहिती संयोजकांकडून देण्यात आली.

- Advertisement -

2) आंदोलनाच्या तयारीसाठी गांव बैठका
14 सप्टेंबर रोजी आरक्षण बचावासाठी ओबीसींच्या होत असलेल्या मोर्चाची तयारी वाडा तालुक्यात गावोगावी बैठका घेऊन सुरु केली होती. समाज माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक विभागाने व्हाट्सअप ग्रुप तयार करुन या मोर्चाबाबत जनजागृती केली आहे.

कोट
वाडा येथे गुरुवारी होत असलेल्या मोर्चा आंदोलनात वाडा तालुक्यातील ओबीसी बांधवांसह विक्रमगड, भिवंडी, शहापूर तालुक्यातीलही समाजबांधव सहभागी होणार आहेत.

- Advertisement -

– नरेश आकरे ,संयोजक

- Advertisment -