घरपालघरबहूचर्चित मध्यवैतरणा प्रकल्प हद्दीत चाललंय काय?

बहूचर्चित मध्यवैतरणा प्रकल्प हद्दीत चाललंय काय?

Subscribe

तत्कालीन परिस्थितीत याबाबत मुंबई मनपाशी संपर्क साधला असता, पुलाच्या बांधकाम व देखभाल दुरूस्तीचा मंजूर निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सुपूर्द करण्यात आला होता.त्यामुळे त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाचीच असल्याचे मनपाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे.

मोखाडा : मोखाडा तालुक्यातील बहूचर्चित मध्यवैतरणा प्रकल्प हद्दीत पुन्हा एका महिलेचे मुंडके विरहीत शव मिळून आले आहे. ३ फेब्रुवारी रोजी एका पुरुष जातीचे शव सापडल्या नंतर अवघ्या चारच दिवसात हे दुसरे शव सापडले असल्याने मध्यवैतरणा परिसर जास्तच चर्चेत आला आहे. ७ फेब्रुवारी रोजी एका ३० ते ३१ वर्षे वयाच्या महिलेचे मुंडके विरहीत शव मिळून आले आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गिते यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली असून मोखाडा पोलीस या गंभीर घटनेचा अधिक तपास करत आहेत.

याआधी सन २०२१ मध्ये माधुरी विकास अहिरे या अंबड ( नाशिक ) पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झालेल्या तरुणीचे शव पाण्यावर तरंगत्या अवस्थेत सापडले आहे.तसेच यापूर्वीही अशा बर्‍याचशा घटना या परिसरात प्रामुख्याने मध्यवैतरणा पुलाखाली घडलेल्या आहेत.परंतु एकूणच जनजीवनाच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना कोणत्याही स्तरावरुन राबवली गेलेली नाही.त्यामुळे गुन्हेगारांचे धाडस वाढले असून गुन्हेगारी सर्रास बोकाळली आहे. मध्यवैतरणा पुलाच्या दुतर्फा सुरक्षा चौक्या उभारणे , सुचना फलक लावणे , रेडीयम लावणे , पथदिवे लावणे तसेच आवश्यक त्या ठिकाणी स्वयंचलित कॅमेरे लावणे या बाबी अत्यंत आवश्यक आहेत.तथापी सन २०१२ साली या प्रकल्पाचे काम पूर्ण होवून आणि प्रत्यक्षात प्रकल्पावरील पूल रहदारीसाठी मोकळा होवूनही संबंधित विभागाकडून त्यावर कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.तत्कालीन परिस्थितीत याबाबत मुंबई मनपाशी संपर्क साधला असता, पुलाच्या बांधकाम व देखभाल दुरूस्तीचा मंजूर निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सुपूर्द करण्यात आला होता.त्यामुळे त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाचीच असल्याचे मनपाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे.

- Advertisement -

आशिया खंडातील सर्वाधिक उंच, लांब, रुंद पूल

मुंबई शहर आणि परिसराला पाणीपुरवठा करणारा महत्वाकांक्षी प्रकल्प मोखाड्यातील कोचाळा येथे सन २०१२ मध्ये साकार झालेला आहे.या प्रकल्पावर रहदारीसाठी आशिया खंडातील सर्वाधिक उंच, लांब, रुंद पूल उभारण्यात आलेला आहे.त्यामुळे हा पूल आणि त्याखाली दुतर्फा पसरलेले पाणी पर्यटकांचे आकर्षण ठरलेला आहे.परंतु या ठिकाणी पर्यटक पादचारी आणि वाहनांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना करण्याची खबरदारी घेण्यात आलेली नाही.त्यामुळे या परिसरात सर्रासपणे छुप्या गुन्हेगारीला वाव मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -