नैराश्यातून तरुणीची आत्महत्या..हे आहे कारण ?

घरातील दुसर्‍या माळ्यावर गॅलरीमध्ये झोका लावण्यासाठी असलेल्या हुकला स्कार्फच्या सहाय्याने तरुणीने गळफास घेऊन आपला जीवन प्रवास संपवला आहे.

कुणाल लाडे, डहाणू : डहाणू पारनाका परिसरात राहणार्‍या एका युवतीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. घरातील दुसर्‍या माळ्यावर गॅलरीमध्ये झोका लावण्यासाठी असलेल्या हुकला स्कार्फच्या सहाय्याने तरुणीने गळफास घेऊन आपला जीवन प्रवास संपवला आहे.

डहाणू पंचायत समिती समोरील एका सदनिकेत राणा कुटुंबीय वास्तव्य करत आहेत. त्यांची 21 वर्षीय तरुण मुलगी क्रिशा राणा हिने”चार्टर्ड अकाउंटंट” परीक्षा दिली होती. यामध्ये तिला कमी गुण मिळाल्यामुळे नैराश्यातून तरुणीने आत्महत्येचा निर्णय घेतला असावा अशी शक्यता कुटुंबीयांनी वर्तवली आहे. याबाबत डहाणू पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून मुलीच्या आत्महत्येस कोणावर संशय किंवा तक्रार नसल्याचे क्रिशाच्या वडिलांनी सांगितले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेबाबत पुढील तपास डहाणू पोलीस करत आहेत.