घरपालघरमुंबई -अहमदाबाद महामार्गावर सल्फर धोका कायम

मुंबई -अहमदाबाद महामार्गावर सल्फर धोका कायम

Subscribe

याबाबतीत कासा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी नामदेव बंडगर यांना विचारले असता, त्यांनी सुद्धा आपले कर्मचारी घटनास्थळी पाठवून पुढील माहिती घेऊन कारवाई केली जाईल असे सांगितले आहे.

डहाणू : मुंबई -अहमदाबाद महामार्गावर 5 फेब्रुवारी रोजी दुपारी तीनच्या दरम्यान गुजरातहून मुंबईकडे जाणार्‍या वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने ज्वलनशील सल्फर मालवाहू ट्रक मेंढवण खिंडीतील वळणावर पलटी झाला. या अपघातात ट्रकमधील सल्फर खाली पडून तास दीड तास वाहन कोंडी झाली होती. महामार्ग प्रशासन आणि महामार्गाच्या मदत केंद्राचे पोलीस घटनास्थळी पोहचून सल्फर बाजूस घेत वाहन कोंडी सोडविली. पण हे ज्वलनशील तसेच आरोग्यास अपायकारक सल्फर कोणतीही काळजी न घेता उचलले गेले. त्याच बरोबर पाणी मारून सल्फर बाजूस केले. तर काही सल्फर पावडर महामार्गाच्या बाजूस पडलेली आहे. अनेक वाहने ये जा करीत असताना दुसर्‍या दिवशी या सल्फरमधून धूर निघत होता. या मुळे जर आग लागली तर मोठी दुर्घटना घडू शकते. या अपघातग्रस्त ज्वलनशिल सल्फरची पावडर काळजीपूर्वक नष्ट करण्यासाठी कोणतीही उपाय योजना केली जात नसल्याबद्दल वाहन चालक नाराजी व्यक्त करीत आहेत. याबाबतीत कासा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी नामदेव बंडगर यांना विचारले असता, त्यांनी सुद्धा आपले कर्मचारी घटनास्थळी पाठवून पुढील माहिती घेऊन कारवाई केली जाईल असे सांगितले आहे.

सदर अपघातग्रस्त ट्रक मधील सल्फरची पावडर बाजूस केली आहे. काही पावडर महामार्गाजवळ पडली असून तेथे सध्या धूर येत आहे. आम्हाला कळल्यावर तेथे काही कामगार सुरक्षेसाठी उभे केले आहेत.
– विशाल कुमार ,ठेकेदार कर्मचारी.

- Advertisement -

रस्त्यात पडलेल्या ज्वलनशील सल्फरमुळे वाहनांना आग लागून मोठी मनुष्यहानी होऊ शकते. मागे तीस वर्षांपूर्वी याच ठिकाणी 102 जणांचा मृत्यू गेला होता. पण महामार्ग प्रशासन आता कोणत्याही प्रकारची काळजी घेत नाही.
– सत्येंद्र मातेरा, वाहन चालक.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -