Eco friendly bappa Competition
घर पालघर पोटाच्या भुकेला गवताच्या काडीचा आधार

पोटाच्या भुकेला गवताच्या काडीचा आधार

Subscribe

प्रतिवर्षी येथील आदिवासींना या माध्यमातून चांगला रोजगार मिळत आहे.10 किलो वजनाच्या गवताच्या भार्‍याला 20 ते 25 रुपये दर मिळतो.

वाडा: दि.२५ पालघर जिल्ह्याचे एकुण क्षेत्रफळ 4219 चौरस किलोमीटर असुन यातील निम्मा भाग हा आदिवासी लोकवस्तीचा आहे. येथील आदिवासींना पावसाळ्यातील चार महिन्यांपैकी दोन महिने शेती कामांमध्ये रोजगार मिळतोय. मात्र उर्वरित दोन महिने कुठलेही काम नसल्याने गांव परिसरातील हिरवे गवत कापून त्याच्या विक्रीतून संसारला आधार उपलब्ध झाला आहे. प्रतिवर्षी येथील आदिवासींना या माध्यमातून चांगला रोजगार मिळत आहे.10 किलो वजनाच्या गवताच्या भार्‍याला 20 ते 25 रुपये दर मिळतो.

जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा या तालुक्यांतील हजारो आदिवासी कुटुंबे उन्हाळ्यातील आठ महिने रोजगारासाठी शहरी भागात स्थलांतर करतात. तर उर्वरित चार महिने गावी परतून शेती, मजुरी करीत असतात. पावसाळ्यातील शेतीची कामे संपल्यानंतर गांव परिसरातील माळरानावर उगविलेले गवत विक्रीतून प्रति दिवस 300 ते 500 रुपये कमवित आहेत. या हंगामात कुठेही रोजगार उपलब्ध नसताना हिरवे गवत विक्रीतून संसारला चांगला आधार येथील हजारो आदिवासी कुटुंबांना गवताच्या काडीने मिळवून दिला आहे. हिरव्या गवताला मुंबई, वसई , कल्याण व आजुबाजुच्या उपनगरात असलेल्या तबेल्यांतून खूप मागणी असते. या मागणीचा लाभ येथील गवताचा व्यवसाय करणारे व्यापारी घेत असतात. ते या परिसरातील आदिवासी बांधवांकडून गवत विकत घेऊन ते तबेल्यांच्या मालकापर्यंत पोहोचवित असतात. जिल्ह्यातील अनेक तरुण या व्यवसायात उतरले असून गवताची वाहतूक करण्यासाठी त्यांनी ट्रक भाड्याने घेतले आहेत.

- Advertisement -

 

आदिवासी भागातील मजुरांना रोजगार, अनेक तरुणांच्या हाताला काम, ट्रक, टेम्पो वाहतुकदारांना रोज वाहन भाडे तर शहरी भागातील दुभत्या जनावरांना हिरवा चारा अशा माध्यमातून सर्वांचेच हित साधणारा हा व्यवसाय आहे.

- Advertisement -

– दिलीप पाटील – गवत विक्री व्यावसायिक, वाडा.

- Advertisment -