घरपालघरमहिलांचा आवाज दाबण्याचे काम,प्रणिती शिंदे यांनी मांडले मत

महिलांचा आवाज दाबण्याचे काम,प्रणिती शिंदे यांनी मांडले मत

Subscribe

वाडा तालुकाध्यक्ष दिलीप पाटील आदी मान्यवरांसह महिला उपस्थित होत्या. महिला मेळाव्यानंतर पुरूष आणि महिलांचे कबड्डी सामने आयोजित करण्यात आले होते.

वाडा: दि.31 महिलांना आदर सन्मान मिळायला पाहिजे तो मिळत नाही.घरी असो वा बाहेर त्यांचा आवाज दाबण्याचे काम केले जात असल्याचे मत काँग्रेसच्या कार्याध्यक्षा तथा आमदार प्रणिती शिंदे यांनी वाडा येथे बोलताना मांडले.
वाडा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने महिला मेळावा आणि हळदीकुंकू समारंभाचे आयोजन मंगळवारी (दि.30)सायंकाळी के.डी.रंगमंच सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या की, काँग्रेस पक्षाने महिलांचा वेळोवेळी सन्मान केला आहे.विविध योजना महिलांसाठी आणल्या आहेत. मात्र आताचे सरकार महिलांच्या विरोधात विचार करणारे आहे.भाजप महिलांकडे वस्तू म्हणून बघतात ती तुच्छ आहे.हे त्यांनी ठरविले आहे. आता यांच्या विरोधात जोरदारपणे महिलांनी रणांगणात उतरले पाहिजे, अशी टिका त्यांनी भाजपवर केली.
या कार्यक्रमास काँग्रेस किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे,पालघर जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील, ज्येष्ठ नेते मनिष गणोरे, निलेश भोईर, वाडा तालुकाध्यक्ष दिलीप पाटील आदी मान्यवरांसह महिला उपस्थित होत्या. महिला मेळाव्यानंतर पुरूष आणि महिलांचे कबड्डी सामने आयोजित करण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -