घरपालघरउत्तन येथील मच्छीमारांच्या घरांवरील कारवाईला स्थगिती

उत्तन येथील मच्छीमारांच्या घरांवरील कारवाईला स्थगिती

Subscribe

या सभेत माजी नगरसेवक लिओ कोलासो, माजी नगरसेविका शर्मिला बगाजी उर्फ गांडोळी, एडवर्ड जाशिंटो, पिटर डीकुन्हा, विन्सन बांड्या, पिटर घावट्या, रेनॉल्ड बेचरी, प्रा. बुरकेन मोठ्या संख्येने मच्छिमार बांधव उपस्थित होते.

भाईंदर :- भाईंदर पश्चिमेच्या उत्तन येथील सर्व्हे क्रमांक २९५ ही महसूल विभागाची जागा आहे. या जागेचा सिटी सर्व्हे झाला नसल्यामुळे या जागेत राहत असलेल्या ८०० मच्छीमारांना घरे हटवण्यासाठी ऑगस्ट २०२३ मध्ये महसूल विभागाने नोटीसा दिल्या होत्या. त्यानंतर तेथे राहणार्‍या मच्छिमारांनी घरावर कारवाई न करण्याची मागणी केली. त्यानुसार आमदार गीता जैन यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे डिसेंबर २०२३ मध्ये पत्रव्यवहार करत १४ फेब्रुवारी रोजी महसूल मंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी हे मच्छिमार गेल्या ५० वर्षांपासून त्या जागेत राहत असल्याचे सांगत त्यांनी महसूल मंत्र्यांकडे कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली. त्यानुसार महसूल मंत्र्यांनी मागणी मान्य करत मच्छिमारांच्या घरावर कारवाई करण्यास स्थगिती दिल्याची माहिती जैन यांनी सोमवारी उत्तन येथील आयोजित सभेत दिली. महसूल मंत्र्यांनी जिल्हाधिकार्‍यांना त्या ५ गावांच्या सिटी सर्वेच्या वाढीव खर्चाचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देत प्रस्ताव सादर होईपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, असे निर्देश देत कारवाईला स्थगिती दिल्याचे जैन यांनी सांगितले. या सभेत माजी नगरसेवक लिओ कोलासो, माजी नगरसेविका शर्मिला बगाजी उर्फ गांडोळी, एडवर्ड जाशिंटो, पिटर डीकुन्हा, विन्सन बांड्या, पिटर घावट्या, रेनॉल्ड बेचरी, प्रा. बुरकेन मोठ्या संख्येने मच्छिमार बांधव उपस्थित होते.

भाईंदर पश्चिमेच्या उत्तन येथील सर्वे क्रमांक २९५ मधील ९ हेक्टर जागा महसूल विभागाची आहे. यापैकी ५ हेक्टर जागा महसूल विभागाकडून स्थानिक मच्छीमारांना मासळी सुकविणे व बोटींवरील जाळ्यांची दुरुस्ती करण्यासाठी देण्यात आली आहे. तर ४ हेक्टर जागेत ८०० स्थानिक मच्छीमारांनी सुमारे ५० वर्षांपासून घरे बांधलेली आहेत. महसूल विभागाने मौजे उत्तन या महसुली गावातील गावठाण व लगतचे २२ सर्वे क्रमांकांचे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार १९८२ साली हक्कनोंद चौकशी करुन त्याच्या मिळकत पत्रिका उपलब्ध केल्या आहेत. तर या क्षेत्राचे नगर भूमापन केलेले नाही. मीरा-भाईंदर शहरातील १९ महसुली गावांपैकी सन २००६ ते २००८ या कालावधीत १४ गावांचे सविस्तर भूमापनाचे काम पूर्ण करण्यात आले. तर मौजे उत्तन, डोंगरी, पाली, तारोडी व चौक या ५ गावांतील स्थानिकांच्या विरोधामुळे मोजणीचे काम दिलेल्या कालावधीत झाले नाही. त्यामुळे महसूल विभागाने सर्वे क्रमांक २९५ वरील ४ हेक्टर जागेत बांधण्यात आलेली घरे हटवण्यासाठी संबंधित ग्रामस्थांना नोटिसा पाठविल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -