घरपालघरवसई विरारमधील जलतरणपटूसह इतर जलतरणपटू जागतिक विक्रमासाठी सज्ज

वसई विरारमधील जलतरणपटूसह इतर जलतरणपटू जागतिक विक्रमासाठी सज्ज

Subscribe

या मोहिमेची सुरुवात गेटवे ऑफ इंडिया येथून 10 डिसेंबरला सकाळी 19. 45 ला होणार आहे.

वसई: वसई- विरारमधील जलतरणपट्टूंसोबत इतर जलतरणपट्टू जलतरणातील जागतिक विक्रमासाठी सज्ज झाले आहेत. ते सहा जलतरणपटू गेटवे ऑफ इंडिया (मुंबई) ते डोना पॉला (गोवा) आणि परत वसई किल्ल्यापर्यंत पोहून एकूण 1100 किलोमीटरचे अंतर पूर्ण करणार आहेत. या मोहिमेची सुरुवात गेटवे ऑफ इंडिया येथून 10 डिसेंबरला सकाळी 19. 45 ला होणार आहे. जलतरणाची ही मोहीम ते 15 दिवसांत पूर्ण करणार आहेत.त्यामुळे हा एक जागतिक विक्रम होणार आहे. यापूर्वी माउंटन व्ह्यू, कॅलिफोर्निया, यू.एस.ए. येथे 2019 मध्ये 959 किमीचा सध्याचा जागतिक विक्रम करण्यात आला होता. तो विक्रम हे सहा जण मोडणार आहेत. या मोहिमेत वसई- विरारमधील जलतरणपट्टू बरोबरच इतर मुलेही सहभागी होणार आहेत.

सर्व सहा सहभागी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू आहेत. ज्यांनी अनेक लांब अंतरावरील खुल्या पाण्यात पोहणे पूर्ण केले आहे. या जलतरणपट्टूंमध्ये कार्तिक संजय गुगले (वय:- 20 ),राकेश रवींद्र कदम ( वय:- 24 ),संपना रमेश शेलार (वय:- 21 ),जिया राय ( वय:- 14 ),दुर्वेन विजय नाईक ( वय:- 17 ),राज संतोष पाटील ( वय :-17 ) यांचा समावेश आहे. या मोहिमेसाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड आणि पोर्ट गोवाची परवानगी घेण्यात आली आहे. त्याचप्रमाणे भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाकडून एनओसी, सुरक्षिततेसाठी आणि पोहण्याचे काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी पुरेशा संख्येने सेफ्टी बोटी आणि लाइफ गार्ड्सची नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय जलतरण महासंघाची परवानगी आणि स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय अधिकार्‍यांकडून परवानगी घेण्यात आली आहे. शनिवार 10 डिसेंबरला ही मोहीम सकाळी 10.45 ला शिक्षण मंत्री दीपक केसरकर , आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत सुरु होणार असून मुले गोवा येथील डोनापावला येथे रवाना होतील. 15 तारखेला हे डोनापावला येथे पोहोचतील. याठिकाणी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत जलतरणपट्टूचे स्वागत करणार आहेत.
15 डिसेंबरला जलतरणपट्टू परतीच्या मार्गावर असणार आहेत. जर वातावरणात बदल झाला नाही तर हे जलतरणपट्टू 23 डिसेंबरला वसई किल्ल्याजवळ पोचण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या जलतरण या मोहिमेसाठी शिवसेनेचे वसई तालुका प्रमुख राजाराम बाबर यांनी मोठे साहाय्य केले आहे. तसेच अनेक संस्था , दानशूर व्यक्तींनी साहाय्य केले आहे, अशी माहिती कार्तिक गुगले या जलतरणपट्टूने दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -